‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:36 PM2018-05-07T22:36:37+5:302018-05-07T22:36:49+5:30

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.

Fatty electric meter hits farmers | ‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

Next
ठळक मुद्देपंप न वापरणाऱ्यांनाही बिले : ४० वर्षांपासून डागडुजी झालीच नाही

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.
आष्टी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पाथरी, कवलेवाडा, पौनारखानी, चांदमारा, गणेशपूर, घानोळ, सुंदरटोला आदी गावांचा समावेश होतो. सदर गावे ही नदीकाठची गावे असून बहुतांश शेतकरी विहीरीवर कृषीपंपाद्वारे शेतीला सिंचन करतात. हांगामी धानपिक घेणारे शेतकरी कृषीपंपाचा उपयोग करीत नाही परंतू सर्वांकडे विद्युत मीटर असून त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. विद्युत मीटर ‘फाल्टी’ असल्यामुळे महावितरण विभागाचे समप्रमाणात विद्युत बिले येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत आहे. आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात ४० वर्षापुर्वी टाकण्यात आलेले विद्युत तारे आजतागायत बदलण्यात आलेले नाही. किंवा त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.
परिणामी या क्षेत्रात कधीही वादळीवारा किंवा अतिउष्णतेमुळे त्या विद्युत तारा तुटत असल्याने विद्युत तारांनीही आता प्राण सोडले असल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा, दवाखाने, राईस मिल, व्यापारी संस्थाने व शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्यात परंतु याकडे अधिकाºयांनीही लक्ष दिले नाही.
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान मुलभूत गरजांकडे जातीने लक्ष घालून शेतकºयांच्या जीवण मरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.


या क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा महावितरणला तक्रारी केल्या परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे आता थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य आष्टी
राज्य शासनाने अधिकाऱ्यांना मोकाट सोडले म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांना असे दिवस पाहावे लागत आहे.
-संगिता मुंगूसमारे, जि.प. सदस्या आष्टी.

Web Title: Fatty electric meter hits farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.