सत्कार म्हणजे उल्लेखनीय कामांची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:37 AM2018-01-24T00:37:10+5:302018-01-24T00:37:34+5:30

समाजात अनेकजण काम करतात. प्रत्येकांच्या कामांची शैली वेगवेगळी असते.

Favors are the receipt of remarkable works | सत्कार म्हणजे उल्लेखनीय कामांची पावती

सत्कार म्हणजे उल्लेखनीय कामांची पावती

Next
ठळक मुद्देनाना पटोले : बोदरा येथे कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार सोहळा

आॅनलाईन लोकमत
साकोली : समाजात अनेकजण काम करतात. प्रत्येकांच्या कामांची शैली वेगवेगळी असते. काम करीत असताना एखाद्या व्यक्ती समाजाला उपयुक्त अशा कामात उच्चांक गाठतो व ती व्यक्ती विशेष ठरते. त्या व्यक्तीचा सत्कार होत असल्यास ती त्यांच्या उल्लेखनीय कामाची पावती समजावी लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानद्वारा आयोजित स्मृती सोहळा व सत्कार समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष टोलसिंग पवार हे होते. अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँगे्रेसचे महासचिव धनंजय दलाल, काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड.रविंद्र दरेकर, माजी विक्रीकर उपायुक्त प्रकाश बाळबुद्धे, सरपंच सरिता राऊत, पोलीस पाटील विठ्ठल कापगते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भेजराम फुलबांधे, मातोश्री यशोदा कापगते, जि.प. सदस्य दीपक मेंढे, मंदा गणवीर, आकाश कोरे, पं.स. सदस्य छाया पटले, लखन बर्वे, लालचंद लोथे, माजी सभापती तारा तरजुले, नरगसेवक अ‍ॅड.दिलीप कातोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश सूर्यवंशी, सचिव होमराज कापगते उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव होमराज कापगते यांनी केले. यावेळी त्यांनी माजी आमदार स्व.मार्तंडराव कापगते यांचे जीवनकार्य सांगून आठवणींना उजाळा दिला. यावेळी कापगते स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा ज्येष्ठ नागरिक पुरस्कार नुरचंद पाखमोडे रा.लाखनी, अर्जुन मेश्राम रा.खंडाळा यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा हंसराज मेश्राम यांना देण्यात आला. शेतकरी पुरस्कार चंद्रशेखर लंजे रा.सिर्सीपार यांना तर शिक्षक पुरस्कार मुबारक सय्यद रा.खराशी यांना अतिथींच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी रामाजी कापगते विद्यालय बोदरे व मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी या दोन्ही शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अर्चना बावणे व रूपेश कापगते यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सहसराम बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे जासवंत कापगते, डॉ.वामनराव डोंगरवार, परशुराम लांजेवार, रुपचंद समरीत, अर्चना बावणे तसेच शिक्षकवृंद कर्मचारी, विद्यार्थी, पालक व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Favors are the receipt of remarkable works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.