बिनाखी-गोंडीटोला मार्गावर अपघात होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:45+5:302021-04-13T04:33:45+5:30

बिनाखी ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या ३ किमी अंतरच्या डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या या मार्गावर ...

Fear of an accident on the way to Binakhi-Gondito | बिनाखी-गोंडीटोला मार्गावर अपघात होण्याची भीती

बिनाखी-गोंडीटोला मार्गावर अपघात होण्याची भीती

googlenewsNext

बिनाखी ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या ३ किमी अंतरच्या डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे. मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावर असणाऱ्या पुलावर भगदाड पडले असल्याने रात्री प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर तीन पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु तिन्ही पुलांवर खड्डे पडले आहेत. जीवघेणे खड्डे पडल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपघात झाले आहेत. या खड्ड्यात त्यांच्या सायकली कोसळल्या आहेत. परंतु प्रशासन बेखबर असल्याने गावकऱ्यात संताप निर्माण झाला आहे. गोंडीटोला ते महालगावपर्यंत ५ किमी अंतरापर्यंत या मार्गाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण मंजूर करण्यात आले होते. वाढत्या अतिक्रमणामुळे मार्ग पांदण रस्त्यात परावर्तित होत आहे. यामुळे सुकळी नकुल, गोंडीटोला गावातील नागरिकात नाराजीचा सूर आहे. पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची ओरड सुरू झाली आहे. या मार्गाच्या दुरुस्तीकरिता तत्काळ निधी मंजूर करण्याची मागणी भाजपचे युवा नेते किशोर राहगडाले, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले, ग्रामपंचायत सदस्या शीतल चिंचखेडे यांनी केली आहे.

Web Title: Fear of an accident on the way to Binakhi-Gondito

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.