कोरोनाची मनात भीती कायम, एसटी प्रवासाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:27+5:302021-06-23T04:23:27+5:30
नागपूर-तुमसर बस नागपूरहून सकाळी ११.३० वाजता सुटली. वाहकाने सर्वप्रथम सर्वप्रवाशांना मास्क लावण्याची सूचना दिली. वाहकाने आपल्या जवळील सॅनिटायझर काढून ...
नागपूर-तुमसर बस नागपूरहून सकाळी ११.३० वाजता सुटली. वाहकाने सर्वप्रथम सर्वप्रवाशांना मास्क लावण्याची सूचना दिली. वाहकाने आपल्या जवळील सॅनिटायझर काढून दोन्ही हाताला लावले. त्यानंतर तिकिटांचे बुकिंग केले. तिकडे चालकही मास्क लावून बस चालवित होता. ३२ प्रवाशांपैकी बहुतांश सर्वांनी मास्क लावले होते. परंतु काही प्रवाशांच्या मास्क हनुटीवर दिसत होते. चालकाने दीड तासाच्या प्रवासात दोन ते तीन दा मास्कबाबत सूचना दिल्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे मात्र पालन होत नव्हते. प्रवासी अगदी जवळजवळ बसल्याचे दिसून येत होते. वाहकाला याबाबत विचारले तर पूर्णक्षमतेने बस सुरू झाल्याने सीटवर दोन जण बसणार, असे सांगितले. एसटीचा प्रवास कोरोना संसर्गातही सुरक्षित असल्याचे दिसून आले.
बॉक्स
एक तासाच्या प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क
चालक
बस सुरू करण्यापूर्वी चालकाने हात सॅनिटाइज करून तोंडावर मास्क लावला. मात्र तो मास्क कधी वर तर कधी खाली करताना दिसत होता.
वाहक
वाहकाने पूर्णवेळ मास्क लावल्याचे दिसत होते. सर्व प्रवाशांच्या तिकिटा काढल्यावर हात सॅनिटाइज करून तो कॅबिनमधील चालकाच्या बाजूला जाऊन बसला. प्रवासादरम्यान पूर्णवेळ मास्क लावून तो इतर प्रवाशांनाही सूचना देता होता.