वाघाशी झुंज देणाऱ्या रूपाली मेश्रामचा 'बार्टी'तर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:37 PM2019-01-07T21:37:48+5:302019-01-07T21:38:26+5:30

अंगणात आलेल्या पट्टेदार वाघाशी १५ मिनिट झुंज देवून आई व शेळ्याचा जीव वाचविणाºया साकोली तालुक्यातील उसगाव येथील रूपाली मेश्राम तरूणीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) पुणे येथे एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

Felicitated by Rupali Meshram's 'Barti', who fought with Waghhi | वाघाशी झुंज देणाऱ्या रूपाली मेश्रामचा 'बार्टी'तर्फे सत्कार

वाघाशी झुंज देणाऱ्या रूपाली मेश्रामचा 'बार्टी'तर्फे सत्कार

Next
ठळक मुद्देपुणे येथे गौरव : आई व शेळ्यांचा वाचविला होता जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणात आलेल्या पट्टेदार वाघाशी १५ मिनिट झुंज देवून आई व शेळ्याचा जीव वाचविणाºया साकोली तालुक्यातील उसगाव येथील रूपाली मेश्राम तरूणीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) पुणे येथे एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
पुणे येथील कोरेगाव पार्क येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात राज्यातील सावित्रींच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. त्यात भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील उसगाव येथील रूपाली मेश्राम या वाघाशी झुंज देणाऱ्या तरूणीचा समावेश होता. रूपाली आपल्या घरी झोपली असताना शेळीच्या ओरडण्याचा आवाज आला. ती बघायला बाहेर आली असता वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. तब्बल १५ मिनिटे झुंज देवून आई आणि स्वत:चे प्राण वाचविले. एका तरूणीने हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावले, अशा या निडर तरूणीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शारदा बडोले, समाजकल्याण आयुक्त मिलिंंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एका तरूणीचा गौरव झाल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Felicitated by Rupali Meshram's 'Barti', who fought with Waghhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.