ढिवर समाजातील गुणवंत विद्यार्थी, पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By admin | Published: September 23, 2015 12:49 AM2015-09-23T00:49:13+5:302015-09-23T00:49:13+5:30
पवनी मच्छी उत्पादक सह. संस्थेच्या वर्धापन दिनी ढिवर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप...
पवनी : पवनी मच्छी उत्पादक सह. संस्थेच्या वर्धापन दिनी ढिवर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप तथा पदाधिकाऱ्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय मत्स्यजीव संघाचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, भोई समाज क्रांती दलाचे अध्यक्ष राजेंद्र तामरखाने, के.एन. नान्हे, प्रा.आलोक केवट, घुसाजी मेश्राम, सहाय्यक कार्यकारी अभियंता नितीन पचारे, सागर काजळे, बावनकुळे, पुरुषोत्तम भोयर, संजय केवट, दिलीप परसने आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी भंडारा पं.स. चे सभापती प्रल्हाद भुरे, साकोली पं.स. चे उपसभापती लखन बर्वे, धानोरीचे सरपंच नामदेव वाघधरे, निष्टीचे सरपंच विलास डहारे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. १० वी च्या परीक्षेत ९२ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या मोहाडीची आभा मेश्राम व चौथी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट आलेले करिना पचारे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, संचालन अंगद शिवरकर व आभार प्रदर्शन जनार्धन नागपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपाध्यक्ष मधुकर शिवरकर, श्रीराम नान्हे, प्रभू नान्हे, नामदेव शिवरकर, श्रीराम नागपुरे, फागो दिघोरे, चंद्रकला नान्हे, व्यवस्थापक रमेश शिवरकर, दीनदयाल पचारे, भास्कर कांबळे, सुलोचना शिवरकर आदींनी विशेष प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)