बारावीच्या निकालात मुलींची भरारी
By admin | Published: May 29, 2017 12:15 AM2017-05-29T00:15:51+5:302017-05-29T00:15:51+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने (सीबीएसई) रविवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला.
तुमसरची अपेक्षा पटले जिल्ह्यात प्रथम : निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने (सीबीएसई) रविवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात तुमसर येथील शिरिनभाई नेत्रावाला शाळेची विद्यार्थीनी अपेक्षा पटले हिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तिला ९३.६० टक्के गुण प्राप्त झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे यावर्षीही बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते.
महर्षी विद्या मंदिर, भंडारा
भंडारा : येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतून एकुण १४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी पास झालेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मिहीर राजेंद्र अग्रवाल या विद्यार्थ्याने ९०.९४ टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेची विद्यार्थीनी हर्षा अतुल वैद्य हिने ७६.४० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्रृती ओहळे व पालकांनी कौतुक केले आहे.
युएसए विद्यानिकेतन, तुमसर
तुमसर : येथील युएसए विद्यानिकेतन शाळेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. युती रहांगडाले या विद्यार्थीनीने ९० टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. मुस्कान माधवाणी हिने ८८ टक्के गुण प्राप्त केले. मुस्कान जैन व रिया पोटफोडे यांनी अनुक्रमे ८२.२० टक्के व ८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
शिरीनभाई नेत्रावाला, तुमसर
तुमसर : येथील शिरीनभाई नेत्रावाला शाळेच्या पाच विद्यार्थीनींनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. यात प्रथम क्रमांकावर अपेक्षा पटले असून तिने शाळासह जिल्ह्यात प्रथम क्रमाक प्राप्त केला आहे. यानंतर रिया ढगे ९२.८० टक्के, ओशी शर्मा ९१.८० टक्के, शुभम राऊत ९१.२० टक्के तर मनस्वी पंचभाई हिने ९१ टक्के गुण प्राप्त केले आहे.
सनफलॅग स्कूल, वरठी
वरठी : येथील सनफलॅग शाळेतील राघव बजाज या विद्यार्थ्यांने गणीत या विषयात ९५ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
या शाळेतून २३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. तृप्ती बाभरे हिने इंग्रजी विषयात ९३ टक्के तर अभिजित मोहरकर या विद्यार्थ्याने रसायनशास्त्र विषयात ९१ टक्के गुण प्राप्त केले आहे.
सनिज् स्प्रिंग डेल, भंडारा
भंडारा : शहरातील कृष्णनगरी येथे स्थित सनिज् स्प्रिंग डेल शाळेचा निकाल ८७ टक्के लागला. या शाळेतून प्रणय तेजराम आस्वले या विद्यार्थ्यांने ८८.४० टक्के गुण घेवून प्रथम स्थान प्राप्त केले. द्वितीय क्रमांक सिध्देश रासेगावकर याने प्राप्त केला त्याला ८६ टक्के गुण मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अनघा पदवाड, सचिव सुनिल मेंढे व पालकांनी कौतुक केले आहे.