भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

By admin | Published: December 23, 2015 12:31 AM2015-12-23T00:31:40+5:302015-12-23T00:31:40+5:30

नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले.

The fierce truck crushed the fate | भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

भरधाव ट्रकने इसमाला चिरडले

Next

मृतदेह झाला छिन्नविछिन्न : सातोना-शहापूर मार्गावरील घटना
मोहदुरा : नवेगाव येथून मोहदुराकडे जाणाऱ्या एका सायकलस्वाराला शहापूरहून सातोनाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले. यात दामा फुकटू कुंभरे (६०) रा. नवेगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान सातोना मार्गावरील मोहदुरा वळणावर घडली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप केला जात आहे.
दामा कुंभरे हे बेलदारीचे काम करतात. आज मंगळवारला कामाला सुटी असल्यामुळे ते काही कामानिमित्त ते मोहदुरा येथे सायकलने निघाले. दरम्यान शहापूरहून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने नवेगाव-मोहदुरा मार्गावरील वळणावर त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कुंभरे यांचा घटनास्थळीच ठार होऊन मृतदेह छिन्नविछिन्न झाला. घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. अपघाताची वार्ता पसरताच घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. घटनेचा तपास भंडारा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)


प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार ?
सातोना - शहापूरमार्गे दररोज शेकडो ट्रकांचे आवागमन भरधाव वेगात सुरु असते. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे आवागमन असते. दिवसरात्र सुरु असलेल्या या जड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी रेतीच्या भरधान ट्रॅक्टरने एका बालिकेचा चिरडले होते. आज पुन्हा ट्रकच्या धडकेत एका इसमाचा नाहक बळी गेला. या मार्गावर अनेकदा लहानमोठे अपघात सुद्धा घडलेले आहेत. या रस्त्यावर असलेल्या वृक्षामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना सामोरचे काहीच दिसत नाही. अपघात ज्या रस्त्याच्या मोडीवर घडला तिथे झाडे कापण्याची गरज आहे. असे असतानाही याकडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही?

Web Title: The fierce truck crushed the fate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.