भरधाव ट्रकने वृद्धाला चिरडले
By admin | Published: June 25, 2017 12:14 AM2017-06-25T00:14:58+5:302017-06-25T00:14:58+5:30
दुचाकीने घरून शेताकडे जात असताना साकोलीकडून भंडाराकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
लाखनी येथील घटना : अपघाताची श्रृखंला थांबता थांबेना
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : दुचाकीने घरून शेताकडे जात असताना साकोलीकडून भंडाराकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथील जयस्तंभ चौकात घडली.
लक्षमण पाटील बकाराम गायधनी (७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. गायधनी हे शनिवारला सकाळी घरून जयस्तंभ चौकातून दुचाकीने शेताकडे जात होते. दरम्यान चौकाच्या मध्यभागी दुचाकी भरधाव ट्रक (डब्ल्यू बी ४८०४) च्या चाकाखाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाानंतर मृतदेह कुटूंबीयांना देण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
उड्डाणपूल केव्हा होणार?
लाखनी येथील चौकात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. याठिकाणी मागीलवर्षी उड्डानपुलाचे भूमिपूजन करण्यात आले परंतु कामाला अद्यापपर्यंत सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आणखी किती जणांना जीव गमवावा लागेल असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.