सिहोरा परिसरातील दूध उत्पादकांचे पन्नास लाखाचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:09+5:302021-06-25T04:25:09+5:30

चुल्हाड ( सिहोरा ) : बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटाने अक्षरश: कोलमडला आहे. त्यात भरीत भर देशात सुरु असलेल्या ...

Fifty lakh errors of milk producers in Sihora area | सिहोरा परिसरातील दूध उत्पादकांचे पन्नास लाखाचे चुकारे थकीत

सिहोरा परिसरातील दूध उत्पादकांचे पन्नास लाखाचे चुकारे थकीत

Next

चुल्हाड ( सिहोरा ) : बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटाने अक्षरश: कोलमडला आहे. त्यात भरीत भर देशात सुरु असलेल्या कोरोना महामारीने घातली आहे. दुसरीकडे भंडारा जिल्हा दूध सहकारी संघाने सिहोरा परिसरातील १५ गावातील दूध डेअरी संस्थांचे अंदाजे ५० लाखांपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अडवून ठेवल्याने दूध उत्पादक कमालीचा आर्थिक संकटात सापडला आहे. हे वास्तव लोकप्रतिनिधींच्या दालनात अनेकदा मांडण्यात आले आहे. मात्र आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळाले नसल्याने दूध उत्पादकांत रोष व्यक्त होत आहे. सिहोरा परिसरात गोपालन केल्या जाते आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. अनेक शेतकऱ्यांनी दुधाच्या व्यवस्थापनातून समृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतीतून हाती काही येत नसल्याने शेतकऱ्यांची भिस्त दूध उत्पादनावरच आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे दुधाळ जनावरे आहेत.

सिहोरा परिसरातील शेतकरी भंडारा जिल्हा दूध संघ आणि खाजगी संघांना लाखो लीटर दूध देण्यात येत आहे. मात्र मागील १४ हप्त्याचे चुकारे अडले आहेत. मागील चार महिन्यापासून चुकारे मिळवण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघांचे कार्यालय गाठून चपला झिजवीत आहे. उडवाउडवीच्या उत्तरापलीकडे त्यांच्या हातात काहीच लागत नाही. यामुळे परिसरात संतापाची लाट वाहत आहे. घरच्या प्रपंचापासून तर जनावरांच्या खाद्य, चारा या विवचंनेत असून आर्थिक कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी संबोधणारे लोकप्रतिनिधी सुद्धा कोमात गेल्याचे दिसून येत आहे. मागील सहा महिन्यापासून जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे अंदाजे ११ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहे. मात्र शासन दरबारी या गंभीर समस्येची दखल कुणीही घेताना दिसत नाही,एक नव्हे तर तब्बल चौदा चुकारे अडलेले आहेत. मागील वर्षाची दिवाळी सुद्धा अंधारात गेली. हक्काचे पैसे मिळत नाही.

दूध संघाशी वारंवार या संदर्भात विचारणा केली जात आहे. दूध संघ सुद्धा गंभीर नाही. त्यांनी सुद्धा दुसऱ्यांकडे बोट दाखवायला सुरवात केली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी संतापला आहे. सहा महिन्यापासून १४ हप्त्याचे चुकारे अडले आहे. एकट्या सिहोरा परिसरातील १५ गावातील दूध डेअऱ्यांचे ५० लाखांचे चुकारे त्वरित देण्यात यावे ही मागणी गडीराम बांडेबूचे, महेंद्र बांगरे, धनराज वैद्य, प्रमेश उताणे, सुनील गाढवे, चंद्रकांत ढबाले, पुरुषोत्तम पटले, मिलिंद हिवरकर, नंदकिशोर तूरकर, हरिश्चंद्र बोकडे, भिवराम सारंगपुरे, श्रीराम ठाकरे, किरण येळे, मुकुंद आगाशे, नाना सिंदपुरे यांनी केली आहे. मागील सहा महिन्यापासून सिहोरा परिसरातील पन्नास लक्ष तर संपूर्ण जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे ११ कोटी रुपयांचे देयक भंडारा जिल्हा दूध संघाने थकीत केले आहे. या संदर्भात पाच महिन्यात नेते प्रफुल्ल पटेल, शेतकरी नेते नाना पटोले, तर मंत्री सुनील केदार यांची दूध उत्पादक शिष्टमंडळानी भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. नेत्यांनी सुद्धा नित्य नियमानुसार आश्वासनाचा डोस देत समाधान करून दिले. मात्र आज सहा महिन्याचा काळ संपला असतांना सुद्धा आश्वासन हवेत विरल्यासारखं झालं आहे. याहून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुर्दैव कोणते असावे.

Web Title: Fifty lakh errors of milk producers in Sihora area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.