अत्याचाराविरूध्द लढा द्या

By admin | Published: August 20, 2016 12:22 AM2016-08-20T00:22:23+5:302016-08-20T00:22:23+5:30

आंबेडकरी चळवळीला चालना देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

Fight against atrocities | अत्याचाराविरूध्द लढा द्या

अत्याचाराविरूध्द लढा द्या

Next

प्रफुल पटेल यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा
भंडारा : आंबेडकरी चळवळीला चालना देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी दिलेल्या मुलमंत्रानुसार सामाजीक न्याय विभागाच्या पाठीशी खंबीर उभा आहे. अन्याय अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी सर्वाेतोपरी मदत करेल. सामाजीक न्याय विभागाचे पक्षसंघटन मजबुत करून अन्याय अत्याचाराविरूध्द लढा द्यावा, असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय सभागृह येथे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, अतुल लोंढे, आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, महेश जैन आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रविंद्र वानखेडे यांनी तयार केलेल्या कार्यकारिणी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संचालन रत्नमाला वैद्य यांनी केले. आभार अरुण अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास वासनिक, मनोहर रंगारी, नितीन वानखेडे, डॉ. मारोती मडामे, सितकुर गेडाम, डॉ. अरुण गजभिये, राहुल वानखेडे, रविंद्रकुमार मेश्राम, शीलमंजु सिंहगडे, शैलेश गजभिये, डॉ. परिघ गजभिये, जयपाल नंदागवळी, तिलक गजभिये, अध्यक्ष नंदलाल भैसारे, कैलास बन्सोड, विशाल वंजारी, योगेश ढवळे, नितीन तुमाने, सचिन बागडे आदी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Fight against atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.