आरक्षणाच्या मुद्यावर लढा तीव्र करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:08 AM2018-08-24T01:08:27+5:302018-08-24T01:08:51+5:30
भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. यासाठी डॉ. विकास महात्मे यांचे पाठीशी उभे राहून संघर्ष करीत लढा तीव्र करण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन जिल्हा धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे यांनी केले.
मरठे यांनी २४ सप्टेंबरला होणाऱ्या आरक्षण उपोषण आंदोलनात धनगर बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. धनगर बांधवांची सभा धनगर संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने पंडितराव पांडे यांचे निवासस्थानी मरठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेला डॉ. मधुकर नवरंगे, किसन थाटकर, सुरेश कवाने, प्रकाश हातेल, पंडितराव पांडे, ओमप्रकाश पडोळे, देविदास चाफले, नरेश पडोळे, जयशंकर घटारे, राजेश थेरे, वर्षा अहिर, प्रेमलाल अहिर, तुळशिदास खऊळ आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करून राज्याची घटना जाळणाºया त्या समाज कंठकचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी सर्वानुमते धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष प्रकाश हातेल, जयशंकर घटारे, सचिव सुरेश कवाने, सहसचिव विलास हातेल, वर्षाव अहिर, कोषाध्यक्ष ओमप्रकाश पडोळे, सहकोषाध्यक्ष मातोरी गोमासे, प्रमोद फोपसे, संघटक पंडितराव पांडे, सहसंघटक प्रेमलाल अहिर, देविदास चाफले, अनिल घोरपडे, प्रसिद्धी प्रमुख तुळशिदास खऊळ, कार्याध्यक्ष विजय मुकूर्णे, मार्गदर्शक प्रा. शंकर गायकी, शालिकराम अहिर, श्रीकृष्ण घटारे यांचा समावेश आहे.
सदस्य म्हणून अशोक टापरे, अशोक पेरे, हरिदास पडोळे, मोतीराम मोरे, गुलाब मोरे, तेजेश्वर लोहारे, अतुल लोहारे, रविंद्र चहानकर, सुभाष मुकूर्णे, नितीन चावटकर, चंद्रशेखर कोंडेवार, महेंद्र घटारे, विठ्ठल पडोळे, प्रेमलाल अहिर यांचा समावेश आहे.
अहिल्या क्रांती सेना कार्यकारिणीत अध्यक्षा विद्या पांडे, उपाध्यक्षा विजया चाफले, उपाध्यक्षा शुभांगी पडोळे, सचिव नितु वर्षा मुकूर्णे सहसचिव कुसुम नवरंगे, सहसचिव सुप्रिया गायकी कोषाध्यक्ष लिला हातेल, सहकोषाध्यक्ष शारदा अहिर, सिमा खऊळ, प्रसिद्धी प्रमुख भाग्यश्री पाटील तर सदस्य म्हणून इंदिरा पडोळे, विमल पडोळे, कांता अहिर, प्रतिमा करताळे, ज्योती टापरे, माधवी वावरे, छब्बुताई थाटकर, सुनिता हातेल, उर्मिला अहिर आदींचा समावेश आहे. संचालन देविदास चाफले व आभार नरेश पडोळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.