सरकारी दरानुसार रेमडेसिवीर विक्री न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:05+5:302021-04-10T04:35:05+5:30

सध्या दर दिवसाला हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी दररोज १० ते १५ रुग्णांचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू ...

File a case against those who do not sell Remedesivir at government rates | सरकारी दरानुसार रेमडेसिवीर विक्री न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

सरकारी दरानुसार रेमडेसिवीर विक्री न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

googlenewsNext

सध्या दर दिवसाला हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी दररोज १० ते १५ रुग्णांचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झाल्यापासून रेमडेसिवीर नावाचे एक इंजेक्शन वापरण्यात आरोग्य यंत्रणांनी सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना संख्या आटोक्यात येण्यात मदत झाली आहे. काेरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर केला जात आहे. रेमडेसिवीरच्या उत्पादकांनी या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १३०० रुपयेप्रमाणे करण्यात येत होती. म्हणजेच सरासरी १०४० रुपये या किमतीत याचा विक्री दर ठरविण्यात आला आहे. फेब्रुवारीपासून रुग्णालये आणि रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. पण अनेक फार्मासिस्ट व खासगी रुग्णालयात रुग्णांकडून छापील किमतीनुसार आकारणी केली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. अन्न व औषध प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी व एकच दर सार्वजनिक करून विक्रीचे आदेश द्यावेत. जी खासगी रुग्णालये वा औषधी दुकाने साठेबाजी करत असतील व जादा दराने विक्री करत असतील, त्यांचे लायसेन्स रद्द करावे. तथा रेमडेसिवीर इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, सामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

शिष्टमंडळात शशिकांत भोयर, अचल मेश्राम, डाॅ. देवानंद नंदागवळी, नाशिक चवरे, शशिकांत देशपांडे, मनोज खोब्रागडे, राहुल वानखेडे, रेखा टेंभुणे, श्रीराम बोरकर, शिवदास गजभिये, अंबादास नागदेवे, रोशन जांभुळकर, तुळशीराम गेडाम, माधव नारनवरे, ॲड. पदमाकर टेंभुणीकर, धम्मपाल गजभिये, केतन मेश्राम, हेमा गजभिये आदी उपस्थित होते.

Web Title: File a case against those who do not sell Remedesivir at government rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.