ट्रॅक्टर पळवणाऱ्यावरगुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:05 AM2021-02-18T05:05:52+5:302021-02-18T05:05:52+5:30
नायब तहसीलदार पवार यांनी उमरी येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ झेड ५४९६ व ट्रॅक्टर ...
नायब तहसीलदार पवार यांनी उमरी येथे अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ झेड ५४९६ व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ झेड ९७४४ पकडले. यातील क्रमांक दोनला नायब तहसीलदारांनी बाजूला करुन ठेव असे सांगून बाजूला झाले. परंतु ड्रायव्हर व मालकाने आपला ट्रॅक्टर क्रमांक एन.एच. ३६ झेड ९७४४ रेती खाली करुन तिथून पसार झाला व ट्रॅक्टर क्रमांक एकचे ड्रायव्हर याला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले व या एकाच ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी अर्जदार भीमराव कापगते व त्यांचेसोबत गजानन पर्वते. तुळशीराम डोंगरवार. भूषण नगरीकर उपस्थित होते.