सेवापुस्तिका गहाळ प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:15+5:30
आपल्या मर्जीनुसार मुख्याध्यापक नेमता येत नाही म्हणून जाणीवपूर्वक प्रभारी मुख्याध्यापक पद नेमून सेवा जेष्ठ व्यक्तीवर अन्याय करणे अशावेळी प्रभारी पदाला मान्यता देण्यात येऊ नये, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायीत शाळांमधील मुख्याध्यापकाची पद मान्यता व पात्रतेनुसार शिक्षक नेमून त्यांच्या देखील मान्यता प्रस्ताव व्यवस्थापनाने पाठवल्या शिवाय आरटीईची मान्यता मान्यता वर्धित न करणे, राष्ट्रीयीकृत बँकेतून शिक्षकांचे वेतन व्हावे यासाठी संघटनेची भूमिका शासनाला कळविणे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांना घेऊन शिक्षण विभाग माध्यमिक येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्ती प्रस्ताव व सोबत महत्त्वाची असलेली सेवा पुस्तिका गहाळ झाल्याचे लक्षात आले. यावेळी आमदार नागो गाणार यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
आदिवासी शिव विद्यालय राजेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ बडवाईक यांनी ३ ऑगस्ट २०२० ला सेवानिवृत्ती प्रकरण सादर केले होते. सेवा पुस्तीके सहित हा प्रस्ताव गहाळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांच्या सामूहिक आणि वैयक्तिक तक्रारींवर चर्चा झाली. यात एक तारखेला शिक्षकांचे वेतन झालेच पाहिजे, सेवानिवृत्ती प्रकरण दाखल झाल्याबरोबर ते निकाली लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, कोणत्याही शिक्षकांचे वैद्यकीय बिल अडवून ठेवण्यात येऊ नये, समायोजन ज्येष्ठतेनुसार व नियमानुसार झाले पाहिजे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रकरणे निकाली काढण्यात यावीत.
आपल्या मर्जीनुसार मुख्याध्यापक नेमता येत नाही म्हणून जाणीवपूर्वक प्रभारी मुख्याध्यापक पद नेमून सेवा जेष्ठ व्यक्तीवर अन्याय करणे अशावेळी प्रभारी पदाला मान्यता देण्यात येऊ नये, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायीत शाळांमधील मुख्याध्यापकाची पद मान्यता व पात्रतेनुसार शिक्षक नेमून त्यांच्या देखील मान्यता प्रस्ताव व्यवस्थापनाने पाठवल्या शिवाय आरटीईची मान्यता मान्यता वर्धित न करणे, राष्ट्रीयीकृत बँकेतून शिक्षकांचे वेतन व्हावे यासाठी संघटनेची भूमिका शासनाला कळविणे, कोरोणाची लागण झाल्याने अनेक शिक्षकांना लाखो रुपये खर्च करून उपचार करावा लागला. हा खर्च वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलात समावेश करणे, भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएस पावत्यांचे तात्काळ वितरण करणे, मुख्याध्यापक कर्मचारी रजा रोखीकरण याचे बिल प्रलंबित न ठेवणे आदींवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी काळजीपूर्वक ही प्रकरणे निकाली निघतील असे आश्वासन दिले. यावेळी उपशिक्षणाधिकारी शेंडे, वरिष्ठ लेखा परीक्षक बोरकर, वेतन अधीक्षक प्रतिभा मेश्राम व शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह अंगेश बेहलपाडे, अध्यक्ष अशोक वैद्य, के. डी. बोपचे, पी .एम .नाकाडे, अशोक रंगारी, सुभाष गरपडे, दिशा गद्रे, मनीषा काशीवार, यादव गायकवाड, हरिहर पडोळे, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राजू बारई, राजेश निंबार्ते, पांडुरंग टेंभरे, राजेंद्र कढव, पुरुषोत्तम डोंमळे, प्रदीप गोमासे उपस्थित होते.