‘त्या’ मृत्यू प्रकरणातील आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:16 PM2018-05-02T22:16:58+5:302018-05-02T22:16:58+5:30

File a human rights complaint against the accused in the 'Death' case | ‘त्या’ मृत्यू प्रकरणातील आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

‘त्या’ मृत्यू प्रकरणातील आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांचे निवेदन : अन्यथा रास्ता रोको आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथभल रश्मी महेंद्र साखरे हिच्या मृत्युला कारणीभूत आरोपीची कसून चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येवून मृतक रश्मीला न्याय देण्यात यावा, असे निवेदन साकोलीवासीयांनी पोलीस निरिक्षकांना दिले.
निवेदनानुसार, रश्मी साखरे (२५) रा. सिव्हील लाईन वॉर्ड साकोली हिचे २६ ला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान निधन झाले. तत्पूर्वी रश्मीने दिलेल्या बयानानुसार दोघांची नावे सांगितली होती. मात्र घटनेला सात दिवसांचा कालावधी लोटूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे रश्मी साखरे हिच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात यावी, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांच्या विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात यावे. आरोपीचा बचाव करण्यास सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा पोलीस प्रशसना विरोधात मोर्च्याचे आयोजन करण्यात येईल तथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देताना कैलास गेडाम, मोहन बोरकर, पी.एस. मेश्राम, महेंद्र साखरे, मंगला साखरे, उमा नंदेश्वर, उमा मेश्राम, अनिता खंडाते, पपीता नंदेश्वर, शिला राऊत, आशा राऊत, सायत्रा बडोले, वंदना राऊत, निर्मला बडोले, मंदा साखरे, अर्चना टेंभुरकर यांच्यासह साकोलीवासीय उपस्थित होते.

Web Title: File a human rights complaint against the accused in the 'Death' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.