जिल्हा परिषदेत आता 'फाईल ट्रॅकिंग' प्रणाली

By admin | Published: February 7, 2015 12:20 AM2015-02-07T00:20:24+5:302015-02-07T00:20:24+5:30

कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शासकीय कामात लेटलतीफपणा होत आहे. यावर नियंत्रण आणता यावे व कामात होणारी दिरंगाई बंद होऊन ..

'File Tracking' system now in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत आता 'फाईल ट्रॅकिंग' प्रणाली

जिल्हा परिषदेत आता 'फाईल ट्रॅकिंग' प्रणाली

Next

प्रशांत देसाई भंडारा
कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शासकीय कामात लेटलतीफपणा होत आहे. यावर नियंत्रण आणता यावे व कामात होणारी दिरंगाई बंद होऊन सूसुत्रता व पारदर्शकता रहावी, यासाठी जिल्हा परिषदमधील सर्व कक्ष आता 'फाईल ट्रॅकिंग' प्रणालीने जोडण्यात येत आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रशासकीय कामात आमुलाग्र बदल करण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबविले असून या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
शासकीय काम म्हटलं की, कामासाठी आलेल्या व्यक्तीला अनेकदा कार्यालयाच्या हेलपाट्या खाव्या लागतात. यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर दोष देण्यात येतो. मात्र, अनेकदा कागदपत्रांची पुर्तता होत नाही. यामुळेही कामात दिरंगाई होते. अशामुळे नागरिकांना शासकीय कामात वारंवार हेलपाटे खावे लागते. कर्मचारीही अनेकदा पैशाच्या मागणीसाठी फाईल प्रलंबीत ठेवीत असल्याचे काही प्रकरण समोर येतात. यावर नियंत्रण आणता यावे, व कामात सूसुत्रता आणून पारदर्शकतेने कामे सुरळीत व्हावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा परिषदेत 'फाईल ट्रेकिंग' व 'ई-टपाल' प्रणाली अस्तित्वात आणली आहे. सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर सामान्य प्रशासन विभागात सुरू केली आहे.
फाईल ट्रॅकिंग व ई-टपाल प्रणालीत जिल्हा परिषदमधील सर्व विभाग जोडण्यात येत आहे. याचे नियंत्रण त्या-त्या विभागाचे विभाग प्रमुख तथा खुद्द मख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी करणार आहेत. यासाठी प्रायोगिक तत्वावर सामान्य प्रशासन विभागात ही 'फाईल ट्रॅकिंग' व 'ई-टपाल' प्रणाली २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
या प्रणालीत संगणकावर संबंधीत विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांचे युजर नेम व पासवर्ड तयार करण्यात येईल. त्या कर्मचाऱ्याकडील प्रकरणांची नोंद संगणकावर घेण्यात येणार आहे.
फाईलची वर्गीकरणानुसार नोंद होणार आहे. फाईलची सर्वसाधारण नस्ती कालमर्यादा वर्षभराची किंवा काही दोन ते तीन वर्षांची असते. कालावधीनंतर फाईल कपाटबंद, भंडार किंवा अभिलेख कक्षात ठेण्यात येते किंवा कालबाह्य फाईल नस्ती केल्या जातात याची इतंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. फाईल ट्रॅकिंग प्रणालीने जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागाचे काम महिनाभरात जोडण्यात येणार आहेत.
संगणकावर होणार नोंदी
या प्रणालीत यात एकूण नस्ती, प्राप्त नस्ती, कारवाईसाठी पाठविलेली नस्ती यांचा समावेश राहणार आहे. ज्या कर्मचाऱ्याकडे फाईल आहे, तिची नोंद त्याला दिलेल्या वेबसाईटवर करावी लागणार आहे. यामुळे फाईलची युनिक आयडी तयार होऊन त्यावरून नस्तीचा शोध घेण्यासाठी सहकार्य होणार आहे. यामुळे फाईलची माहिती तात्काळ मिळेल व कर्मचाऱ्याचा वेळ वाया जाणार नाही.
तारीख व वेळेचीही होणार नोंद
एखाद्यावेळी कोणी माहिती मागितल्यास अशा फाईलची माहिती या संगणकीय प्रणालीवरून तात्काळ उपलब्ध होईल. या प्रणालीमुळे फाईल कुठून व कधी आली, कोणाकडे कधी पाठविली आणि तिच्या कामाचा स्तर कोणता ही माहिती प्राप्त होईल. यावरून फाईलचा वेगवेगळा अहवाल घेता येणार असून यात दिनांक व वेळेची नोंद राहणार असल्याने तिला शोधण्यात वेळ जाणार नाही.

Web Title: 'File Tracking' system now in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.