जखमींना मदत करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:40 AM2021-08-25T04:40:28+5:302021-08-25T04:40:28+5:30
शास्त्री वाॅर्डात विनोद घरडे भाड्याने राहतात. त्यांच्या शेजारी असलेल्या कटुंबीयांसोबत हल्लेखोरांचे पार्किंगवरून भांडण झाले होते. या घटनेशी त्यांच्या कुटुंबाचा ...
शास्त्री वाॅर्डात विनोद घरडे भाड्याने राहतात. त्यांच्या शेजारी असलेल्या कटुंबीयांसोबत हल्लेखोरांचे पार्किंगवरून भांडण झाले होते. या घटनेशी त्यांच्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. प्रकरण दुपारी निस्तारले होते. मात्र, त्याच दिवशी आरोपींनी विनोद घरडे यांच्या घरावर चालून आले व शेजारील झोपडीची नासधूस केली. कामगारांना धमकावून विनोद घरडे यांना शिवीगाळ करीत होते. काय झाले म्हणून पाहण्यास आलेल्या विनोद घरडे यांच्यावर त्यांनी लोखंडी रॉडने हल्ला चढवून मारहाण केली. दरम्यान, त्यांचे भाऊ चंद्रकांत झळके व सचिन झळके मदतीला आले व जखमी विनोद घरडे व सूर्यकांत झळके यांना भंडारा येथील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, हल्लेखोरांच्या तक्रारीवरून जखमी विनोद घरडे व मदतीला धावून आलेले चंद्रकांत झळके, सूर्यकांत झळके व सचिन झळके यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून जखमींवर भंडारा येथे उपचार सुरू असून त्यांची साधी विचारपूसही पोलिसांनी केली नाही. दोषी पोलीस व हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.