बिबट्यांवर दगडफेक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:10+5:302021-08-14T04:41:10+5:30
नरेंद्रकुमार माणिक देशपांडे (रा. गोबरवांही) असे दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ८ ऑगस्टला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारखारीच्या ...
नरेंद्रकुमार माणिक देशपांडे (रा. गोबरवांही) असे दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ८ ऑगस्टला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारखारीच्या डोंगरी कक्ष क्रमांक ८ मध्ये झाडावर बसलेल्या दोन बिबट्यांवर दगडफेक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली. या व्हिडिओत पाचजण दिसत होते. त्यापैकी दोघांनाही बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली असे दिसते. या प्रकरणाची तक्रार वाईट फाउंडेशन टायगर सेलकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व वनविभाग खडबडून जागा झाला. अखेर दगडफेक करणाऱ्या नरेंद्रकुमार माणिक देशपांडे याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये शिकारीचा प्राथमिक गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस. एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय आणि वनरक्षक ए. एन. पवार करत आहेत.
बॉक्स
बिबटा हल्लाप्रकरण दिल्ली दरबारी
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील संरक्षित वनात बिबट्यावर दगडफेक प्रकरणाची दिल्ली येथील वाईल्ड लाईफ संस्थेने दखल घेतली आहे. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून जंगलाच्या अधिवासात राहणाऱ्या वन्यप्राण्यांवर दगडफेक कशी करण्यात आली, याची गंभीर दाखल घेतली आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इतर चार जण कोण आहेत व त्यांची भूमिका कोणती याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे. संरक्षित वनात वाहन उभे कसे केले, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.