अखेर ३६ तासानंतर निघाला तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:43 PM2019-02-20T21:43:35+5:302019-02-20T21:43:58+5:30

मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली दबून चेतन जवंजार या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर रात्रीलाच पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट शुक्राचार्य विद्यालयासमोर ठेवण्यात आला.

Finally, after 36 hours, | अखेर ३६ तासानंतर निघाला तोडगा

अखेर ३६ तासानंतर निघाला तोडगा

Next
ठळक मुद्देशाळेसमोर ठेवला पार्थिव : प्रकरण विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूचे

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी/साकोली : मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली दबून चेतन जवंजार या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर रात्रीलाच पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट शुक्राचार्य विद्यालयासमोर ठेवण्यात आला. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. परिणामी तब्बल ३६ तासानंतर संस्थाचालक महादेव गजापुरे यांनी लेखी आश्वासन दिल्याने तोडगा निघाला.
मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचे इयत्ता नववीचे चार विद्यार्थी डेक्सबेंच सोडण्याकरिता ट्रॅक्टरने मुंडीपार येथे गेले होते. परत येत असतांना ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक मारला. यात ट्रॅक्टरचा इंजिनवर बसलेला चेतन हा विद्यार्थी खाली कोसळला. यात ट्रॅक्टरचा चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला. घटनेची वाच्यता वाऱ्यासारखी होताच कुटूंबीयासह शेकडो नागरिकांनी घटनास्थळी किटाडीत धाव घेतली. जोपर्यंत मुख्याध्यापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान मंगळवारी रात्री आंदोलकांनी नमते घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. दरम्यान शवविच्छेदनानंतर चेतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू आर्थिक मदत मिळत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, अशी भुमिका घेत आंदोलकानी चेतनचा मृतदेह शितपेटीत बुधवारी विद्यालयासमोर ठेवला. सकाळी १० वाजतापासून शाळेसमोर आंदोलक बसले होते. घटनास्थळी परिस्थिती चिघळू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, पिंपरेवार, बंडोपंत बन्सोडे, तहसीलदार मल्लीक विराणी घटनास्थळावर उपस्थित होते. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास संस्थाध्यक्ष महादेव गजापूरे यांनी मृतकाच्या कुटुंबाला ५ लक्ष रूपये देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर चेतनचा मृतदेह शाळेसमोरून उचलण्यात आला. चेतनच्या पार्थिवावर गुरूवारला सकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संवेदनशिलता हरविली
घटनेला ३६ तासांचा कालावधी लोटूनही याप्रकरणी तोडगा न निघाला नसल्याने चेतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होवू शकले नाही. मृत्यूनंतरही चेतनला यातना भोगाव्या लागल्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला. त्याच मार्गाने शुक्राचार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग गजापुरे लाखनी येथे जात होते. घटनेची माहिती माहित असूनही गजापूरे हे घटनास्थळी थांबले नाहीत. परिणामी त्यांच्या विरोधात जनक्षोभ उफाळला
काळजाचा तुकडा अपघातात अचानक मृत्यूमुखी पडला. जवंजार कुटूंबीयावर दु:खाचे आभाळ कोसळले. अशा स्थितीतही तोडगा काढण्यासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने शाळा प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित असल्याचे यावेळी ऐकीवात होते.

Web Title: Finally, after 36 hours,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.