अखेर खेळाडूंना मिळाली बक्षिसांची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:45 PM2018-04-10T23:45:49+5:302018-04-10T23:45:49+5:30

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाद्वारे जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा संपल्यानंतर बक्षिसांची रोख रक्कम खेळाडूंना न देता हडप करून त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले होते.

Finally the amount of prizes received by the players | अखेर खेळाडूंना मिळाली बक्षिसांची रक्कम

अखेर खेळाडूंना मिळाली बक्षिसांची रक्कम

Next
ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांना घातला होता घेराव : विजेत्यांना मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाद्वारे जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा संपल्यानंतर बक्षिसांची रोख रक्कम खेळाडूंना न देता हडप करून त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले होते. याबाबत सीनेट सदस्य प्रविण उदापुरे यांच्या नेतृत्वात अधिक्षक अभियंत्यांना घेराव घालून निर्वानिचा इशारा देण्यात आला होता. यादरम्यान पाटबंधार विभागाने नमते घेऊन दौड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसाची रक्कम समारंभात परत केली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संपूर्ण खेळाडूंना बक्षिसांची रक्कम, शिल्ड व येण्या जाण्याचा खर्च पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आला. याप्रसंगी सिनेट सदस्य प्रविण उदापुरे, गोसीखुर्द प्रकल्प (अंबाडी) अधिक्षक अभियंता नार्वेकर, सहायक अधिक्षक अभियंता रहाणे, क्रीडा अधिकारी मरस्कोल्हे, प्रा. देवेश नवखरे आदी उपस्थित होते.
जलजागृती सप्ताह अंतर्गत भरविण्यात आलेली धावण्याची स्पर्धा वय वर्षे १७, १९, २५ व खुला अशा गटात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत जिंकणाऱ्या खेळाडूंना ७००, एक हजार व १५ हजार रुपये अशी पारितोषिकांची रक्कम देण्याचे घोषित करण्यात आले होते.
स्पर्धेसाठी जिल्ह्यातील करडी, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, पवनी येथून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर विजयी खेळाडूंना पारितोषिकांची रक्कम न देताच रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले. बक्षिस पात्र ठरलेले खेळाडू, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जलसंपदा विभागाचे आंबाडी येथील कार्यालय तसेच भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे १० दिवसांपासून हक्काची पारितोषिकांची रक्कम मिळविण्यासाठी वारंवार चकरा मारत होते.
संपूर्ण प्रकरणाची दखल घेवून २ एप्रिल रोजी नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रविण उदापुरे यांनी क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेऊन आंबाडी येथील गोसे खुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता नार्वेकर यांचे कार्यालयास धडक दिली. अधीक्षक अभियंत्यांचा तब्बल तीन तास घेराव घालण्यात आला होता.
सर्व खेळाडूंना त्यांच्या बक्षिसांची हजारो रुपयांची रक्कम सन्मानासहित परत करण्यात यावी तसेच त्यांच्या वारंवार येण्याजाण्याचा तिकीटांची संपूर्ण खर्च गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाने द्यावा, अन्यथा गोसेखुर्द प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशाराही तेव्हा देण्यात आला होता. दरम्यान खेळाडूंच्या या लढ्याला यश लाभले. व सन्मानाने त्यांच्या बक्षीसांची रक्कम छोटेखानी समारंभात परत करण्यात आले.

Web Title: Finally the amount of prizes received by the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.