अखेर काँग्रेस-राकाँ युतीची घोषणा

By admin | Published: November 17, 2015 12:35 AM2015-11-17T00:35:46+5:302015-11-17T00:35:46+5:30

लाखनी नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसजवळ संख्याबळ कमी असल्यामुळे समविचारी पक्षाची काँग्रेस - राकाँ युतीची घोषणा आज ...

Finally, the announcement of the Congress-RCA Alliance | अखेर काँग्रेस-राकाँ युतीची घोषणा

अखेर काँग्रेस-राकाँ युतीची घोषणा

Next

लाखनीत सभा : नगरपंचायत निवडणूक
लाखनी : लाखनी नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसजवळ संख्याबळ कमी असल्यामुळे समविचारी पक्षाची काँग्रेस - राकाँ युतीची घोषणा आज माजी आमदार सेवक वाघाये यांचे कार्यालयात आयोजित सभेत करण्यात आली.
काँग्रेस - राकाँ पदाधिकाऱ्यांत पुन्हा चर्चा घडून आली. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये, तालुका अध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, मनोज टहिलानी, परवेज आकबानी, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, तालुका अध्यक्ष डॉ.विकास गभणे, बाजार समितीचे संचालक अशोक चोले यांच्या उपस्थितीत चर्चा पार पडली.
यात काँग्रेसचे नगरसेवक धनंजय तिरपुडे, ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, अनिल निर्वाण, कल्पना भिवगडे, भोला उईके, सुरेखा निर्वाण, गीता तितीरमारे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनू व्यास, दिपाली जांभुळकर उपस्थित होते.
सभेत काँग्रेसचा गटनेता म्हणून भोला उईके यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीण तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता म्हणून दिपाली जांभुळकर यांची निवड करण्यात आली. दोन्ही गटनेत्यांच्या व काँग्रेस राकाँ नगरसेवकांच्या सह्या बंधपत्रावर घेवून युतीला लिखीत स्वरुप देण्यात आले.
लाखनी नगरपंचायतमध्ये सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी राजकीय पक्षात ओढाताण होणार काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तुर्तास युती झाल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष व राकाँचा उपाध्यक्ष होणार याची निश्चिती झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Finally, the announcement of the Congress-RCA Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.