...अखेर अतिक्रमणधारकांच्या मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:21+5:302021-09-24T04:41:21+5:30

आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमित शासकीय जमिनीची मालकी, दिव्यांग विधवा परितक्त्या व भूमिहिनांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात यावा, ...

... finally approved the demands of the encroachers | ...अखेर अतिक्रमणधारकांच्या मागण्या मंजूर

...अखेर अतिक्रमणधारकांच्या मागण्या मंजूर

Next

आंदोलनकर्त्यांनी अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमित शासकीय जमिनीची मालकी, दिव्यांग विधवा परितक्त्या व भूमिहिनांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ देण्यात यावा, घरकुलाची अनुदान राशी ३ लाख रुपये करण्यात यावी व ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ मंजूर करण्यासह अन्य मागण्या केल्या होत्या. याबाबत लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ जी. पी. अगर्ते यांनी आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तर ग्रामपंचायतींना कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आंदोलनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी, मंगेश वंजारी, उपप्रमुख धनराज हटवार, साकोली विधानसभा प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्णे, तालुकाप्रमुख प्रकाश नाकतोडे, प्रसिद्धी प्रमुख खेमराज भुते, महिला तालुकाप्रमुख हेमलता लांजेवार, छाया शेंडे, अरविंद राऊत, आदेश शेंडे, सुनील भोयर, शुभम लांडगे, ईश्वर मेश्राम, दिलीप रामटेके, सुधाकर बारसागडे, दिलीप बोरीकर, पवन भोयर, दिनेश मेश्राम, आनंद झोडे, रवी तिरपुडे, राजकुमार भुजाडे, मारोती चौधरी, अमोल गजभिये, बळीराम मेंढे, राजू दोनाडकर, वैभव ठाकरे, अर्चना मेश्राम, रशिका भोयर, गोपिका प्रधान यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

230921\img20210922151429.jpg

मंजुर मागण्यांचे लेखी आश्वासन देतांना बिडीओ व आंदोलनकर्ते

Web Title: ... finally approved the demands of the encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.