...अखेर ते बांधकाम दुसरीकडे हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:32 AM2018-12-14T00:32:01+5:302018-12-14T00:33:22+5:30
पवनी तालुक्यातील चिचाळ येथील तलाठी भवन वास्तु बांधकामाला ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कंत्राटदारांनी बगिच्यामध्ये बांधकामाला जागा उपलब्ध केली. सदर बांधकामाला ग्रामस्थ व उपसरपंचा मंजुषा गभणे बांधकाम अडविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील तलाठी भवन वास्तु बांधकामाला ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कंत्राटदारांनी बगिच्यामध्ये बांधकामाला जागा उपलब्ध केली. सदर बांधकामाला ग्रामस्थ व उपसरपंचा मंजुषा गभणे बांधकाम अडविले. सदर प्रकरणाची दखल तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळाला भेट देवून सदर बांधकाम त्याच गटात दुसरीकडे हलविले व कंत्राटदाराला बगीचाची झालेली नुकसान भरपाई करुन देण्याचे आदेश दिले.
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती पुरस्कारातून मागील सरपंचा उषा काटेखाये व महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप रामटेके यांचे पुढाकाराने २ लक्ष ९७ हजार रुपयांचे गार्डनचे बांधकाम करण्यात आले. मात्र नव्याने विराजमान ग्रामपचांयत यांचे दुर्लक्षाने बगिच्यामध्ये गवताचे साम्राज्य झाले असून कित्येक झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. गार्डनसाठी कित्येक लोकांनी सहभाग दिला. मात्र बगिच्यात पाण्याचीच व्यवस्था नसल्याने गार्डन दुर्लक्षीत झाले आहे.
तालुक्यात चिचाळ हे गाव क्रमांक दोनचे गाव आहे. गावाला मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय नसल्याने येथे आमदार निधीतून तलाठी भवनाचे बांधकाम मंजूर झाले आहे. सदर बांधकामासाठी कंत्राटदार यांनी गावात जागा उपलब्ध असतांनाही किंवा ग्रामपंचायतला विश्वासात न घेता गार्डनमधील जीवंत झाडे जाळून बगिच्याची रॅलींग तोडली. सदर घटनेचा गावात तिव्र रोष व्यक्त करुन ग्रामस्थांनी व उपसरपंचा यांनी कंत्राटदार यांना धारेवर धरुन तंबी देवून काम बंद केले. सदर प्रकरण चिघळत आहे, हे लक्षात येताच तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळ गाठून संबंधीत स्थळाची मौका चौकशी करुन गट क्रमांक ९०५ मध्येसाईनाथ दुग्ध डेअरी शेजारील जागेत तलाठी वास्तूची जागा नियोजित करुन दिली व बगिच्याची नुकसान भरपाई कंत्राटराने पुर्ण करुन देणार अशी उपस्थितांना समोर सांगितले. यावेळी तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळ गाठून संबंधीत स्थळाची मौका चौकशी करुन गट क्र. ९०५ मध्येच साईनाथ दुग्ध डेअरी शेजारील जागेत तलाठी वास्तूची जागा नियोजित करुन दिली व बगिच्याचे झालेले नुकसान भरपाई कंत्राटदाराने पूर्ण करुन देणार अशी उपस्थितांना समोर सांगितले.
यावेळी तहसीलदार गजानन कोकुर्डे, मंडळ अधिकारी कावटे, पं.स. सदस्या मंगला रामटेके, उपसरपंचा मंजुषा गभणे, सरपंचा लोपमुद्रा वैरागडे, वर्षा काटेखाये, मोना तिभागेवार, अल्का काटेखाये, तंमुस अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, दिलीप रामटेके, दिनेश नंदपूरे, शामलाल रामटेके, निलेश काटेखाये, आशिष मेश्राम, प्रदिप भुरे, जगतराम गभणे व ग्रामस्थ उपस्थित होते.