अखेर दिव्यांगांना मिळाले प्रमाणपत्राचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:16 AM2021-09-02T05:16:40+5:302021-09-02T05:16:40+5:30
चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळले होते. प्रमाणपत्र नसल्याने शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित झाले ...
चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळले होते. प्रमाणपत्र नसल्याने शासकीय योजनेपासून लाभार्थी वंचित झाले होते. प्रमाण पत्रासाठी अनेक विभागाचे चकरा मारल्यानंतर न्याय मिळत नव्हते. यामुळे लाभार्थी त्रस्त झाले होते. सरपंच उमेश कटरे यांनी गावात असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची शोध मोहीम राबवली आहे. त्यांनी स्वखर्चाने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली आहे. त्यांना प्रमाणपत्र प्राप्त करून दिले आहे. गावातील २४ लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळाल्याने समाधानाचे चित्र दिसून येत आहे.
कोट
माहिती नसल्याने अनेक लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यांच्याकडे दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी गावातच त्यांचे फार्म भरले जाणार आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार असून शासकीय मदतीचा आधार मिळेल.
उमेश कटरे, सरपंच, मोहगाव खंदान