अखेर पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:33 AM2021-02-14T04:33:18+5:302021-02-14T04:33:18+5:30

तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात. धान पिकाच्या उत्पादन काढल्यानंतर शेतकऱ्यांना शासकीय ...

Finally, a grain procurement center was started at Pimpalgaon | अखेर पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू

अखेर पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू

Next

तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात. धान पिकाच्या उत्पादन काढल्यानंतर शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी लागते, परंतु तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रांची संख्या कमी झाल्याने शेतकरी बांधवांची धान विक्री करण्यासाठी तारांबळ उडत असल्याची बाब आमदार राजू कारेमोरे यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी याबाबत शासन प्रशासन स्तरावर तत्काळ पाठपुरावा करून, तुमसर व मोहाडी तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी यथा शीघ्र वाढीव शासकीय आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आग्रह धरला. मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार संस्था डोंगरगावचे वतीने मौजा पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण अतकरी, देवा इलमे, प्रदीप बुराडे, संजू मते, शाम कांबळे, दामा समरीत, गुड्डू बांते, संध्या गभने, विद्या गभने, रामेश्वर चोपकर, कैलाश सातपैसे, राजकुमार चोपकर, पंचम चोपकर, सुभाष चोपकर, शिवशंकर गभने, आकाश चोपकर, श्रीधर गिरेपुेजे, लंकेश मोटघरे आदी उपस्थित होते

Web Title: Finally, a grain procurement center was started at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.