अखेर चौकशी समितीला सापडला मुहूर्त

By admin | Published: May 9, 2016 12:29 AM2016-05-09T00:29:14+5:302016-05-09T00:29:14+5:30

तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला अखेर मुहूर्त सापडला.

Finally, the inquiry committee found Muhurat | अखेर चौकशी समितीला सापडला मुहूर्त

अखेर चौकशी समितीला सापडला मुहूर्त

Next

प्रकरण बयाण गोपनीयता भंगचे : १० रोजी होणार चौकशीला प्रारंभ, चौकशीकडे अनेकांच्या नजरा
भंडारा : तालुक्यातील पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणी चौकशी समितीला अखेर मुहूर्त सापडला. जिल्हा परिषद आरोग्य समीतीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार आहे. या प्रकरणातील सत्यता ते जाणून घेणार असून चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकशीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला अंतर्गत असलेल्या उपकेंद्र दवडीपार येथे २२ डिसेंबर २०१५ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान कपाटात व टेबलावर अस्ताव्यस्त स्थितीत लस आढळून आली होती. ती लस चुकुन बालकांना दिल्या गेली असती तर जीवितहानी झाली असती. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी वरिष्ठांकडे तशी माहिती सादर केली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे बयान घेतले. मात्र घेण्यात आलेले बयान सार्वजनिक झाले. नोंदविलेले बयान नियमानुसार गोपणीय ठेवले जातात. बयान सार्वजनिक करणे गंभीर बाब आहे. त्यामुळे जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली. यानंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीत पुन्हा दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून संबधितांच्या बयाणांचे रेकॉर्डिगही केले. एकाच प्रकरणाचे तीनदा बयान नोंदविण्यात आले. तीनदा बयान नोंदविण्यात येऊन देखील कारवाई मात्र शुन्य आहे.
पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे बयान गोपनीय झाल्यासंबधीचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होत आहे. या प्रकरणात आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. त्यांना अधिकाऱ्यांकडूनच पाठबळ मिळत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणाविषयी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय बयान सार्वजनिक झाल्यासंबधी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्याचे ठरले. या समितीत आरोग्य समितीतील तीन सदस्य व दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तशी प्रक्रीया प्रोसिडींगवर घेण्यात आली होती.
अखेर जिल्हा आरोग्य विभागाला मुहूर्त सापडला. चौकशी समितीत सदस्यांना नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य समीतीचे सदस्य प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चमू १० मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल होणार आहे. या प्रकरणातील सत्यता ते जाणून घेणार आहेत.
चौकशी समितीत अध्यक्ष प्रदीप बुराडे, सदस्य म्हणून चंद्रप्रकाश दुरुगकर, चंदूलाल पिल्लारे, प्रदीप बुराडे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर आणि तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जूगनाके यांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)

'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
बयान गोपनीय प्रकरणात आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. पालकमंत्र्यांसह खुद्द वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार गोपनीय बयान सार्वजनिक होणे चुकीचे आहे, हे मान्य करतात. मात्र वरिष्ठ अधिकारी 'त्या' अधिकाऱ्यांच्या पाठीशी गंभीर उभे असून बयान सार्वजनिक होणे गंभीर नसल्याचे म्हणतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई करुन वरिष्ठांना पाठबळ देणे हा अन्याय नाही का?, गोपनीय बयान सार्वजनिक करण्यात आले त्याची जबाबदारी कुणाची?, कारवाईसाठी वरिष्ठांकडून टाळाटाळ का?, आदी विविध प्रश्न मनाला भेडसावणारे आहे. प्रकरणाची योग्य चौकशी झाल्यास 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, यात मात्र शंका नाही.

Web Title: Finally, the inquiry committee found Muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.