अखेर सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:25 AM2017-07-23T00:25:07+5:302017-07-23T00:25:07+5:30

मागील वर्षभरापासून खंडीत असणारा महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

Finally, the power supply of irrigation projects started | अखेर सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु

अखेर सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु

Next

८५ लाखांचा निधी मंजूर : यावर्षी पाण्याचा उपसा होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड/ तुमसर : मागील वर्षभरापासून खंडीत असणारा महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८५ लाख रुपयांचा निधी खेचून आणण्यात आमदार चरण वाघमारे यांना यश आले आहे. येत्या दोन दिवसात प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा होणार आहे.
सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या वर्षात ८० लाखांची थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. या शिवाय प्रकल्पस्थळात विद्युत मिटर जप्तीची कारवाई वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात आली. प्रकल्पस्थळात हा घटनाक्रम सुरु असताना चुल्हाड शिवारात उन्हाळी धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात आले. यामुळे जलाशय पूर्णत: रिकामे झाले. खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यात चिंता निर्माण झाली. शिवाय प्रकल्पस्थळाकडे असणारी विजेची थकबाकी शेतकऱ्यांची धाकधुकी वाढविणारी ठरली. ऐन पावसाळा तोंडावर असताना पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली नाही. टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. विजेचा पुरवठा सुरु करण्यात आला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. प्रकल्पस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी प्रयत्न सुरु केले. ८५ लाखांचा पॅकेज खेचून आणण्यात त्यांना यश आले. ८० लाखांची वीज देयकाची थकबाकी वीज वितरण कंपनीला देण्यात आली आहे. उर्वरीत पाच लाखांचा निधी प्रकल्पस्थळात देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्यात खर्च करण्यात येणार आहे. तब्बल वर्षभरानंतर प्रकल्पस्थळात खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. पंपगृहाचे देखभाल व दुरुस्तीचे कामांना गती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात बावनथडी नदी पात्रातील पाण्याचा उपसा प्रकल्पस्थळात केला जाणार आहे. या पाण्याची साठवणूक चांदपूर जलाशयात होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. सिंचनात ६० कोटींचा अनुशेष पाणी वाटप करणारा लघु पाटबंधारे विभाग अडचणीत आहे.
या विभागात रिक्त पदाचा अनुशेष आहे. याशिवाय डावा आणि उजवा कालवा अंतर्गत नहर व पादचाऱ्यांची झालेली अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे. या विभागाअंतर्गत असणाऱ्या रनेरा स्थित डाक बंगल्याची स्थिती भीतीदायक झाली आहे. या विभागात विकास कार्यासाठी ६० कोटींचा अनुशेष आहे. नहराचे सिमेंट अस्तरीकरण अडले आहे. कार्यालयाचे इमारती जीर्ण झाली आहे. फर्निचर तुटलेला आहे. या समस्या निकाली काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

Web Title: Finally, the power supply of irrigation projects started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.