अखेर २.६ कोटींचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:06 PM2018-03-12T23:06:56+5:302018-03-12T23:06:56+5:30
तुमसर तालुक्याला नरेगातंर्गत मिळणारा प्रलंबित कुशल निधी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आक्रोश आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुक्यातील सरपंच संघटनेनी प्रशासनासह राज्य शासनाला दिला होता.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : तुमसर तालुक्याला नरेगातंर्गत मिळणारा प्रलंबित कुशल निधी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आक्रोश आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुक्यातील सरपंच संघटनेनी प्रशासनासह राज्य शासनाला दिला होता. अखेर सरकारने संबधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर दोन कोटी सहा लाख रुपयांचा कुशल निधी वळता केला आहे.
पूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मजुराच्या हाताला काम मिळावा म्हणून राज्य सरकारने रोजगार हमी योजना काढली होती. त्यात उद्देश फक्त मजुरांना काम इतकेच होते. मात्र पण २००५ ला केंद्र सरकार ने तिच योजना देश पातळीवर राबविण्याचा कायदा बनविला. त्याला 'नरेगा' असे नाव दिले. .त्याच्यात सुधारणा करुन दोन भाग केले. एक अकुशल व दुसरा कुशल. त्यात ग्रामपंचायतने ग्रामसभेत अकुशल व कुशल कामांचे नियोजन करून ६० टक्के निधी, मजुरांना काम व ४० टक्के निधीत गावाचा विकास असे धोरण तयार केले. त्या अंतर्गत ग्रामीण भागात मजुरांना काम व मोठ्या प्रमाणात सीमेंट रस्ते, नाल्या, सिंचन विहीर, पाणघाट, गुरांचे गोठे, कुकुटपालन शेड, मजगी, सिमेंट बंधारा रोपवाटीका, शौचालय व इतर सार्वजनिक आणि लाभाच्या योजनांच्या त्यात समावेश केले. पुर्वी मजुरांनी काम केल्यानंतर अनेक महिने मजुरी मिळत नव्हताी. आता त्यात काही प्रमाणात सुधारणा होऊन मजुरांना बँक खात्यावर मजुरी जमा होत आहे. परंतु कुशल कामाची निधी संबधित ग्रामपंचायतने काम केल्यानंतर वर्षभर जमा होत नाही. त्याचा ग्रामीण विकासावर परिणाम होऊन जिल्ह्यतील अनेक ग्रामपंचायत निधी अभावी अडचणीत सापडलेल्या होत्या. त्यात तुमसर तालुक्यातिल सरपंच संघटनेनी पुढाकार घेऊन प्रलंबित कुशल निधी त्वरित मिळावी, म्हणुन नरेगा आयुक्तांना निवेदन देऊन निधीची मागणी केली होती, अन्यथा सरकार विरोधात 'आक्रोश' मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. दिलेल्या मुदतीत सरकारने काम पूर्ण केलेल्या संबधित ग्राम पंचायतींच्या खात्यावर निधी वळती केली नाही. त्या विरोधात सरपंच संघटना रस्त्यावर आली. पंचायत समितीसमोर आंदोलन केले. शेवटी एकता आणि संघषा समोर सरकारला झुकावे लागले. सरकारने संबधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर दोन कोटी सहा लाख रुपयांचा कुशल निधी वळती केला.
सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन लांजेवार, पं.स.सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, माजी सरपंच शिवलाल नागपुरे, दिलीप लांजेवार, नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला माजी आमदार अनिल बावनकर, मधुकर कुकडे, देवचंद ठाकरे, जि.प.सभापती धनेंद्र तुरकर, शंकर राऊत, सिमा भुरे, सुरेश राहांगडाले, ठाकचंद मुंगूसमारे, प्रफुल वºहाडे, महेंद्र चौव्हाण आणि इतर सर्व सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी संघर्षाला साथ दिली.