अखेर खड्ड्यांच्या डागडुजीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:41+5:30
पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा रस्त्यावर एकीकडे डागडुजी तर दुसरीकडे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकाच आठवड्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. गावकऱ्यांचंी व्यथा प्रशासनापुढे मांडली. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काम सदोष असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यानंतर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळबडून जागे झाले. या मार्गावर खड्डे डागडुजीला सुरूवात झाली आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेभाटा रस्त्यावर एकीकडे डागडुजी तर दुसरीकडे रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. एकाच आठवड्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे काम किती दर्जेदार झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. गावकऱ्यांचंी व्यथा प्रशासनापुढे मांडली. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले. दोन दिवसांपासून येथील रस्त्यावर आता डागडुजीच्या कामाला सुरूवात झाली आहे. कंत्राटदाराच्या माध्यमातून डागडुजीचे काम केले जात आहे. मात्र अद्यापही या कामाकडे अधिकाऱ्यांचे याकडे दुर्र्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नव्हते. सर्वसामान्यांना निकृष्ठ होत असलेले काम दिसत असताना अधिकाऱ्यांना ते दिसत नव्हते. मात्र आता लोकमतच्या वृत्तानंतर कामाला सुरूवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
निर्माणाधीन रस्त्यांवर आठवडाभरात खड्डे
अड्याळ परिसरात रस्त्याचे बांधकाम हा संशोधनाचा विषय आहे. अनेक रस्ते निर्माणाधीन असून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसत आहे. अधिकारी याबाबत मुग गिळून गप्प असतात. कंत्राटदारावर कोणतीच कारवाई केली जात नाही. निकृष्ठ रस्त्यांमुळे बांधकामाचा त्रास परिसरातील नागरिकांना सोसावा लागतो. आठवड्याभरात रस्त्यावर खड्डे पडतात कसे याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.