...अखेर जिल्ह्यात रबी धान खरेदीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:36+5:302021-05-21T04:37:36+5:30
रबी हंगामातील धान खरेदी माेठा तिढा निर्माण झाला हाेता. खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने गाेदाम हाऊसफुल्ल हाेते. ...
रबी हंगामातील धान खरेदी माेठा तिढा निर्माण झाला हाेता. खरीप हंगामातील धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने गाेदाम हाऊसफुल्ल हाेते. साधारण १ मेपासून पणनची रबी धान खरेदी सुरू केली जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात धान आल्यावरही खरेदी सुरू हाेण्याचे काेणतेच चिन्ह दिसत नव्हते. ही बाब तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुुुल्ल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मुंबई येथे चर्चा केली. त्यावेळी ना. भुजबळ यांनी येत्या तीन दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यात सात ठिकाणी पणनच्या धान खरेदीला प्रारंभ झाला. भंडारा तालुक्यातील बेळगाव येथे तिरुपती बहुउद्देशीय संस्था, खमारी येथे मानव बहुउद्देशीय संस्था, लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे पिंपळगाव सहकारी भात गिरणी, लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमतसर तालुक्यातील गर्रा, बघेडा येथे कमल सेवा सहकारी संस्था, वाहनी येथे वैनगंगा सेवा सहकारी संस्था आणि साकाेली येथे श्रीराम सहकारी राईस मील येथे गुरुवारपासून आधारभूत किमतीत धान खरेदीला सुरुवात झाली आहे. काेराेना संकटाच्या काळात धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळणार आहे.
बाॅक्स
ऑनलाईन नाेंदणीला मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा
रबी हंगामातील शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी ऑनलाईन सातबारा नाेंदणीची मुदत ३० एप्रिल हाेती; परंतु काेराेना संसर्गामुळे ऑनलाईन नाेंदणी करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. यासंदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली. आता ३१ मेपर्यंत ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ मिळाली असून शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.