अखेर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:24 AM2018-05-09T01:24:43+5:302018-05-09T01:24:43+5:30

भारत निर्माण योजनेअंतर्गत पिंडकेपार ठाणा पेट्रोलपंप मुख्य जलवाहिनीला शहापूर येथील सेलोकर राईस मिल दरम्यान मोठे भगदाड पडले होते. पाण्याचा निचरा होवून नाल्याद्वारे नदीमध्ये जात होता. या आशयाची बातमी लोकमतने मागील आठवड्यात प्रकाशित केली.

Finally, the start of the repair of the main water channel | अखेर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

अखेर मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भारत निर्माण योजनेअंतर्गत पिंडकेपार ठाणा पेट्रोलपंप मुख्य जलवाहिनीला शहापूर येथील सेलोकर राईस मिल दरम्यान मोठे भगदाड पडले होते. पाण्याचा निचरा होवून नाल्याद्वारे नदीमध्ये जात होता. या आशयाची बातमी लोकमतने मागील आठवड्यात प्रकाशित केली. आज त्या जलवाहिनीला दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली. याबाबत ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले.
याबाबत असे की, १ कोटी ४६ लक्ष किमतीची महत्वाकांक्षी भारत निर्माण योजना सन २००७ मध्ये माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. सत्ताबदल झाले. दोन आमदार बदलले. त्याच प्रकारे ठाणा पाणी पुरवठा समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे कंत्राटदार तीन झाले. वाढीव रक्कम समितीला ०ेण्यात आले. योजना दोन कोटीच्या घरात गेली. दहा वर्ष लोटले. ठाणा वासीयांच्या घशात दोन थेंब पाणी गेले नाही. मात्र समिती पदाधिकारी सदस्य यांचे फावले. अपुरी मुख्य जलवाहिनी कशीबशी पूर्ण केले.
जलवाहिनीमध्ये सतत पाणी नसल्यामुळे १० वर्षापासून पाईप ठिसूळ झाले आणि अचानक पाण्याचा दाब वाढल्याने व काही ठिकाणी निष्काळजीने मुख्य जलवाहिनी टाकल्याने सहा महिन्यापासून पाईप उघडे पडले. परिणामी पिण्याचे पाणी सांड नाल्याद्वारे वैनगंगा नदीला जात होते. लोकमतने ही बाब कंत्राटदार व समितीला माहित असताना दुर्लक्ष करीत होते. याबाबत लोकमतने मुद्दा उचलला. ‘पिण्याचे पाणी नदी नाल्यात’ या आशयाची बातमी प्रकाशित केली आली होती. शासन प्रशासनाने दखल घेत मुख्य जलवाहिनी दुरुस्तीला कंत्राटदाराद्वारे सुरुवात करण्यात आली. आतातरी गावाला पाणी मिळेल या आशयाने लोकमतचे आभार मानले.

Web Title: Finally, the start of the repair of the main water channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.