अखेर ‘ते’ अस्वल जंगलात गेले

By admin | Published: January 3, 2016 01:15 AM2016-01-03T01:15:47+5:302016-01-03T01:15:47+5:30

आतेगाव येथील एका घराच्या गोठ्यात दीड महिन्यांपासून एका अस्वलीने पिल्लासह मुक्काम ठोकला होता.

Finally they went into the bear forest | अखेर ‘ते’ अस्वल जंगलात गेले

अखेर ‘ते’ अस्वल जंगलात गेले

Next

आतेगाव येथील घटना : वनविभागाने लावलेले कॅमेरे होते बंद
साकोली : आतेगाव येथील एका घराच्या गोठ्यात दीड महिन्यांपासून एका अस्वलीने पिल्लासह मुक्काम ठोकला होता. ५० दिवसांच्या प्रदीर्घ मुक्कामानंतर शुक्रवारला हे अस्वल पिल्लांसह जंगलात निघून गेली. यावेळी वनविभागातर्फे लावण्यात आलेले कॅमेरे बंद असल्यामुळे त्या अस्वलाचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही.
आतेगावचे उपसरपंच वसंता हटवार यांचा गोठा अतिवृष्टीमुळे पडला. त्या गोठ्यात एका मादी अस्वलने आपले बस्तान मांडले. १० नोव्हेंबरपासून ती तिथे राहू लागली. काही दिवसातच या अस्वलीचे दोन पिलांना जन्म दिला. याची माहिती मिळताच वनविभागाने रात्र व दिवसा चार वनकर्मचाऱ्यांची ड्युटी लावली. तिच्या हालचालीची माहिती घेण्याकरिता कॅमेरेही लावले.
काही दिवसानंतर हे अस्वल रात्रीच्या सुमारास जंगलात जायची आणि पहाटे आपल्या ठिकाणी यायची. काही दिवसानंतर ही पिल्ले मोठी झाली. त्यामुळे हे अस्वल ५० दिवसांच्या मुक्कामानंतर काल शुक्रवारला पिलांसह जंगलात निघून गेली. मात्र ज्या ठिकाणी हे अस्वल पिलांसह मुक्कामाला होते त्याठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावले होते. ते कॅमेरे तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे अस्वलीने जंगलात पलायन करतानाचा छायाचित्र कैद झाले नाही. (तालुका प्रतिनिधी)

अस्वल पुन्हा गावात आली
ही अस्वल शनिवारला सकाळी जंगलात निघून गेली. सायंकाळच्या सुमारासत ही अस्वल पुन्हा दोन पिलांसह आतेगाव येथे आली. मात्र गावकऱ्यांनी आरडाओरड करून अस्वलीला जंगलात पळवून लावले. परंतु वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या अस्वलीचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आतेगाववासीयांनी केली आहे.

Web Title: Finally they went into the bear forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.