अखेर सिहोऱ्यात राज्यमार्गावर गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:27+5:302021-05-12T04:36:27+5:30
याशिवाय राज्य मार्ग अरुंद असल्याने वाहनांच्या अपघातांत वाढ झाली आहे. असे असले तरी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे ...
याशिवाय राज्य मार्ग अरुंद असल्याने वाहनांच्या अपघातांत वाढ झाली आहे. असे असले तरी वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे रोज राज्य मार्गावर अपघात होत असल्याने वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने राज्य मार्गावर गतिरोधक उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले होते.
याशिवाय गतिरोधकांसाठी नागरिकांनी ओरड सुरू केली होती. गतिरोधक करताना बांधकाम विभागाने कंजुसी केल्याचे आरोप गावकरी करीत आहेत. चुल्हाड, हरदोली, मोहगाव खंदान, सिंदपुरी, बपेरा, देवसरा, बिनाखी गावांचे बस स्थानक परिसरात गतिरोधक तयार करण्यात आले नाही. यामुळे भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. याच बसस्थानक परिसरात अधिक अपघात झाले आहेत. गोंदेखारी बसस्थानकाशेजारी बँक असल्याने वाहनांचे गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची ओरड ग्राहक करीत आहेत.