अखेर उसर्रा धान खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:50+5:302021-01-08T05:55:50+5:30
उसर्रा येथे धान खरेदी केंद्र सुरू करा, टाकला रस्त्याचे काम सुरू करून पुलाची उंची कमी करा या मागण्यांसाठी आंदोलन ...
उसर्रा येथे धान खरेदी केंद्र सुरू करा, टाकला रस्त्याचे काम सुरू करून पुलाची उंची कमी करा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आंधळगावचे ठाणेदार सुभाष बारसे, जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे, सहाय्यक अभियंता जगताप, आंदोलनकर्ते सरपंच महेश पटले, सरपंच रामदयाल बिसने, उपसरपंच मनोज शरणागते उपस्थित होते. यात उसर्रा येथे सोमवारपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत उसर्रा -टाकला रस्त्याचे काम तत्काळ सुरु होईल. राष्ट्रीय महामार्गवरील उसर्रा गावाजवळील पुलाच्या उंचीसाठी २० जानेवारी रोजी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे ठरले. दरम्यान, सोमवारी उसर्रा येथील कृषी गोदामात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मोहाडी खरेदी विक्रीचे अध्यक्ष माधव बांते होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच महेश पटले, उपसरपंच मनोज शरणागते आदी उपस्थित होते.