अखेर राजेदहेगावचा पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:46 PM2018-08-11T21:46:45+5:302018-08-11T21:47:24+5:30

सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झाला.

Finally, the water supply of Rajedhegaon started | अखेर राजेदहेगावचा पाणीपुरवठा सुरू

अखेर राजेदहेगावचा पाणीपुरवठा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांचा एल्गार : लोकप्रतिनिधींनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहनगर : सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झाला.
मागील पंधरा दिवसापासून गावात पाणी प्रश्नामुळे हाहाकार निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे स्थानिक शासन प्रशासनापासून तर जिल्हा प्रशासन गावाला भेट देणे सुरू होते. शासकीय कर्मचाºयांच्या तीन दिवस संपामुळे गावातील पाणी प्रश्न चिघडला होता.
बाधीत शेतकरी व स्थानिक शासन प्रशासन यांचे ठिकठिकाणी पत्र व्यवहार एकमेकाविरूद्ध सुरू होते. गाव एकीकडे तर बांधीत शेतकरी दुसऱ्या बाजुला कुणी कुणाची ऐकता दरम्यान गावातील महिलांनी निश्चय केला. गावातील कोणतीही महिला शेतावर व इतर कामावर जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ग्रामपंचायतला कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला होता.
९ आॅगस्टला पाण्याची मटकी, गुंडी ग्रामपंचायत प्रवेशद्वारासमोर फोडण्यात आले होते. दुपारनंतर आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत, घटनास्थळाला भेट देवून सायंकाळपर्यंत तळ ठोकून होते. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी एस.के. बारसे आपल्या ताफ्यासह डेरेदाखल होते. .
आमदार अवसरे यांच्या मध्यस्थिने नरेंद्र भोंडेकर यांनी सार्वजनिक विंधन विहिरीचे बटन दाखून गावातील पाणीपुरवठा सुरू केला.
बाधीत शेतकºयांची विंधन विहीर बंद करण्यात आली. यावेळी बाधीत शेतकरी नारायण ढोबळे उपस्थित होते. ही कारवाही रात्री ११ वाजतापर्यंत सुरू होती आणि गावकºयांनी पाणी सुरू झाल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला.

Web Title: Finally, the water supply of Rajedhegaon started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.