अखेर वनमजुरांना मिळणार मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:31 PM2018-03-13T23:31:57+5:302018-03-13T23:31:57+5:30

तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला नाकाडोंगरी येथे जेलभरो आंदोलन पुकारला.

Finally, the workers will get wages | अखेर वनमजुरांना मिळणार मजुरी

अखेर वनमजुरांना मिळणार मजुरी

Next
ठळक मुद्देनाकाडोंगरी येथील प्रकार : जेलभरो आंदोलनाला यश

आॅनलाईन लोकमत
तुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला नाकाडोंगरी येथे जेलभरो आंदोलन पुकारला.
यात परिसरातील नाकाडोंगरी, लोभी, आष्टी, राजापूर, हिरापुर हमेशा व प ाथरी गावातील मजुरांचे १४ लाख रुपयांचे संपूर्ण वेतनाचे आरटीईजीएस झाल्याने एक दोन दिवसात मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होणार आहे. त्यामुळे मजूर वर्गात उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे आंदोलनात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल जे आॅनलाईन यादीतून गहाळ झाले तो प्रश्न आंदोलनादरम्यान अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे अनुत्तरीतच राहिला. सदर विषय हा खंड विकास अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा असतानाही त्या विभागाचे एकही अधिकारी किंवा त्यांचा प्रतिधिी उपस्थित न झाल्यामुळे अधिकाºयांनी लोकशाहीचा गळा कापला असल्याचे ठपका लावून तहसीलदार शासनाकडे संबंधितावर कारवाईसाठी प्रोसेडींग तयार करणार असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात बोलावले. त्यामुळे आंदोलनाने उग्र रुप न घेता आंदोलनाला स्थगिती दिली व मार्च पूर्वी गहाळ झालेले घरकुल न मिळाल्यास लाभार्थी रस्त्यावर उतरेल असा गर्भीत इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व माजी उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी केले. आंदोलनाला वनविभागाचे सीसीएफ कोडापे, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांनी भेट देवून आंदोलनांची सांत्वना केली. आंदोलनात नाकाडोंगरीचे सरपंचा सारिका कोतपल्लीवार, जितू सयाम, ग्रा.पं. सदस्य सुमित गौपाले, विजय राऊत, मिना मेश्राम, शामलता पारधी, मिश्री देशमुख, भगत राऊत, विजय रासेळ, राजकुमार ढोमणे, इंदू राऊत, सरिता राऊत, रंजित शहारे, रुपचंद पारधी, नंदू भुरे, भागवत पुष्पतोडे, घनश्याम शहारे, जयदेव सोनवाने, विनोद राऊत, श्रीहरी मुंगुसमारे, मोरेश्वर सोनवाने, मुलचंद पंधरे, राजू राऊत, रवी बाविसताले व असंख्य वनमजूर व २७५ घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Web Title: Finally, the workers will get wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.