दुग्ध उत्पादकांना आर्थिक पाठबळ
By admin | Published: June 21, 2017 12:28 AM2017-06-21T00:28:58+5:302017-06-21T00:28:58+5:30
तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने त्यांच्या सदस्यांची विमा राशी भरुन मृत्यू पश्चात कुटूंबीयांना विमा लाभ देण्याची ...
सहकारी संस्थेचा पुढाकार : मृताच्या पत्नीला एक लाखाचा धनादेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या किसान दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने त्यांच्या सदस्यांची विमा राशी भरुन मृत्यू पश्चात कुटूंबीयांना विमा लाभ देण्याची योजना आखून अंमलबजावणी केली. याचा लाभ मृतक रामाजी तलमले यांच्या कुटुंबियांना झाला असून पत्नीला एक लाखांचा धनादेश देण्यात आला.
सल्लागारच्या रुपाने संस्थेचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी मृतक रामाजी तलमले यांच्या पत्नीस विमा राशी प्रदान केली. संस्थेची स्थापना ४८ वर्षापूर्वी माजी आमदार स्व. रामकृष्ण काटेखाये यांनी केलेली होती. तेव्हापासून आतापर्यंत बहुसंख्य शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन करीत आहेत.
दुग्ध उत्पादनामुळे शेतकरी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली परंतू सदस्यांचे मृत्यूपश्चात कुटुंब आर्थिक संकटात सापडते म्हणून संस्थेने हा अभिनव उपक्रम सुरु राबविला आहे. याचा फायदा तलमले कुटुंबियांना झाल्याचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी सांगितले.