भंडारा : शॉर्टसर्किटमुळे लागली आग; गोठा जळाला, भाजल्याने गाय गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:41 PM2023-04-18T18:41:40+5:302023-04-18T18:41:51+5:30
यात एक गाय भाजल्याने गंभीर जखमी झाली. चार लहान जनावरांना बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : लाखनी तालुक्यातील निलागोंदी (पटाची) येथील क्रिष्णा जैपाल हटवार यांच्या घराजवळील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाला. यात एक गाय भाजल्याने गंभीर जखमी झाली. चार लहान जनावरांना बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.
गोठ्यात असलेले साहित्य, तनस, अँगल, प्रोफाइल, शिट जळून खाक झाल्याने अंदाजे १.५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. क्रिष्णा जैपाल हटवार हे अल्पभूधारक शेतकरी असून, शेतीला पूरक जोडधंदा म्हणून पशुपालनासह दुग्धव्यवसाय करीत होते.
गावाच्या सभोवताल वीजतारा आहेत. त्यांच्या घराजवळून वीजतारा गेल्याने तसेच विद्युत खांब वाकल्याने शॉर्टसर्किट झाले तर असावे, असा संशय आहे. या शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.