कोळशाच्या वाघिणीला आग

By Admin | Published: May 7, 2016 12:57 AM2016-05-07T00:57:37+5:302016-05-07T00:57:37+5:30

तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील सायडिीगवर उभ्या एका कोळशाच्या वाघिणीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली.

The fire of the coal rickshaw | कोळशाच्या वाघिणीला आग

कोळशाच्या वाघिणीला आग

googlenewsNext

तुमसर येथील घटना : पालिकेच्या अग्निशामक दलाने विझविले
तुमसर : तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील सायडिीगवर उभ्या एका कोळशाच्या वाघिणीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. प्रथम या वाघिणीतून धूर निघणे सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. शेवटी तुमसर पालिकेच्या अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. अग्निशामक पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.
तुमसर रोड येथे सायडींगवर एनसीआर क्र. १२१३०६३३५९७ क्रमांकाची कोळशाची वाघीण उभी होती. या वाघिणीतून शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास धूर निघताना काही जणांनी पाहिले. याची माहिती रेल्वे स्थानक प्रबंधकांना देण्यात आली. रेल्वे पोलीस दलाने पाहणी केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकावरून प्लास्टिक पाईपने पाण्याचा मारा केला. परंतु आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. स्थानक प्रबंधकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. आग लागलेल्या वाघिणीसोबत दुसरी वाघीण क्रमांक २२१००९८६०९१ होती, परंतु ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. कोळसा वाहून नेणाऱ्या वाघिणींची उन्हाळ्यात वाहतूक धोकादायक असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The fire of the coal rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.