जांभळी-निलागोंदी शिवारातील जंगलात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 12:21 AM2017-03-16T00:21:41+5:302017-03-16T00:21:41+5:30
उन्हाळ्याची सुरूवात अन् जंगलाना आग ही बाब आता नित्याची झाली आहे.
वन्यप्राण्यांची धावपळ : लाखो रूपयांची वनसंपदा आगीत स्वाहा
साकोली : उन्हाळ्याची सुरूवात अन् जंगलाना आग ही बाब आता नित्याची झाली आहे. यात वन्यप्राणी व जंगलाचे नुकसान होत असून वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रंगपंचमीला जांभळी ते निलागोंदी या एफडीसीएमच्या जंगलाला अचानक लागली. या आगीत वनसंपदा जळून राख झाली आणि वन्यप्राणीही सैरावैरा पळाले.
जांभळी ते निलागोंदी या एफडीसीएमच्या कंपार्टमेंट क्रमांक १८२, १८३, १८४ च्या जंगलात दुपारी अचानक आग लागली.
ही आग पाच कि.मी. पर्यंतच्या परिसरात पसरली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली. वन्यप्राणीही सैरावैरा पळाले. दुपारच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आग विझविली. आग लागण्याचे कारण कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)