लाखनीत फटाका सेंटरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:17+5:30
बाजार चौकात अजय सावरकर यांचे अंबिका जनरल स्टोर्स व फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी ठेवले होते. तसेच जनरल स्टोर्सचे साहित्यही होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांच्या आवाज ऐवू लागला. नागरिकांनी धाव घेतली असता. फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. फटाक्यांचे बार उडत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : शहरातील राष्ट्रीय महार्गावरील बाजार चौकात असलेल्या एका फटाक्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत फटाका दुकानासह लगतचे कापड व फुलभंडार भस्मसात झाले. तब्बल अकरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा शहर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेले होते. नागरिकांनी समयसुचकतेने या आगीवर नियंत्रण मिळविले.
बाजार चौकात अजय सावरकर यांचे अंबिका जनरल स्टोर्स व फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी ठेवले होते. तसेच जनरल स्टोर्सचे साहित्यही होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांच्या आवाज ऐवू लागला. नागरिकांनी धाव घेतली असता. फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. फटाक्यांचे बार उडत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. मात्र नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गाचे उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या पाणी टँकरला पाचारण केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले. मात्र या आगीत लगतचे नागराज फुलभंडार आणि लक्ष्मी क्लॉथ स्टोर्स जळाले.
अंबिका फटाका सेंटरचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर नागराज फुलभंडारा व जनरल साहित्य मधील तब्बल सात लाखांचे साहित्य जळाले. या दुकानात कागदी पत्रवाळ्यासह सणासुदीसाठी लागणारे मोठे साहित्य ठेवण्यात आले होते. तर लक्ष्मी क्लॉथ स्टोर्सचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. भंडारा नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
शॉर्टसर्किटने आगीचा अंदाज
फटाका सेंटरला लागलेली आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या दुकानाला आग लागली तेव्हा परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. फटाकाचे आवाजही मोठ्या प्रमाणात येत होते. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.