भंडारा येथे प्लास्टिक कारखान्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 12:14 PM2021-05-25T12:14:15+5:302021-05-25T12:14:39+5:30

Bhandara news भंडारा शहरालगतच्या दवडीपार-पालगाव येथील प्लास्टिक कारखान्याला आग लागण्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. तब्बल ४ तासापासून अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असून या आगीत लाखो रुपयांचे प्लास्टिक भस्मसात झाले.

fire in Plastic factory at Bhandara | भंडारा येथे प्लास्टिक कारखान्याला आग

भंडारा येथे प्लास्टिक कारखान्याला आग

googlenewsNext
ठळक मुद्देचार तासापासून पाच बंबांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : शहरालगतच्या दवडीपार-पालगाव येथील प्लास्टिक कारखान्याला आग लागण्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. तब्बल ४ तासापासून अग्निशामक दलाच्या पाच बंबांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असून या आगीत लाखो रुपयांचे प्लास्टिक भस्मसात झाले.

भंडारा ते  पवनी मार्गांवर दवडीपार- पालगाव शिवारात उमा प्लास्टिक कंपनी आहे. मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कारखान्यात आग लागली. आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा दोन किमी अंतरावरुन दिसत आहे. आगीमुळे सर्वात्र धूर पसरला असून कारखान्यातील परिसरातील वेस्ट प्लास्टिक पूर्णतः जळून खाक झाले. 

भंडारा नगरपरिषदेचा अग्निशामक दलासह, तुमसर,  साकोली येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच भंडारा आयुध निर्माणी व वरठी येथील सनफ्लॅग कंपनीचे बंब आग विझवित आहेत. आगीचे कारण स्पष्ट झाले नसून शाॅर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: fire in Plastic factory at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग