दोन एकरातील धानाचे पुंजणे जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:39 AM2017-11-21T00:39:33+5:302017-11-21T00:39:58+5:30

तालुक्यातील शिवनी मोगरा येथील शेतकरी लीलाबाई मोहन खोब्रागडे (६६) यांच्या शेतातील दोन एकरातील धानाचे पुंजणे गावातील अज्ञात लोकांनी वैमनस्यापोटी आग लावून जाळून टाकल्याचे उघडकीस आले आहे.

The fire was burnt down in two units | दोन एकरातील धानाचे पुंजणे जाळले

दोन एकरातील धानाचे पुंजणे जाळले

Next
ठळक मुद्दे६० हजार रूपयांचे नुकसान : वैमनस्यातून लावली आग

आॅनलाईन लोकमत
लाखनी : तालुक्यातील शिवनी मोगरा येथील शेतकरी लीलाबाई मोहन खोब्रागडे (६६) यांच्या शेतातील दोन एकरातील धानाचे पुंजणे गावातील अज्ञात लोकांनी वैमनस्यापोटी आग लावून जाळून टाकल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे वृद्ध दांपत्यावर संकट कोसळले आहे.
लीलाबाई याची गावात जवळपास पाच एकर शेती असून त्यापैकी यंदा त्यानी तीन एकरात पीक लागवड केली नाही. लीलाबाई आणि त्याचे पती मोहन खोब्रागडे हे म्हतारे असून दोघेच आपल्या शेतीची मशागत करीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु यंदा त्यांच्या शेतीत ट्रॅक्टर जाण्याची अडचण निर्माण झाली.
तसेच पावसाने दगा दिल्याने वेळेवर रोवणी झाली नाही. उर्वरित दोन एकर शेती रस्त्यालगत असून त्यात धान रोवणी करून कसेबसे धान पीक घेतले. त्या पिकाची कापणी करून शेतातच पुंजणे बनवून ठेवले. धान मळणी मशीनने मळणी करणार होते. परंतु गावातील काही असामाजिक तत्वांनी त्यांच्या तोंडातला घास हिसकावण्याचे घृणीत काम करीत दोन एकरातील सर्व पुंजणे आग लावून जाळून टाकले. त्या वृद्ध दांपत्यावर संकट कोसळले आहे. या घटनेची तक्रार लीलाबाई यांनी पोलीस स्टेशनला केली आहे. तसेच महसूल विभागाला सांगितले आहे. सदर नुकसानीचा मोबदला शासनस्तरावर मिळावा, अशी मागणी वृद्ध शेतकºयांनी केली आहे.
धानाचे पूंजणे भस्मसात
तुमसर : तामसवाडी (तुडका) शेतशिवारातील धानाचे पुजणे जाळल्याची घटना घडली. धान आगीत भस्मसात झाले. यात ७५ हजारांचे आर्थिक नुकसान संबंधित शेतकºयांचे झाले. तलाठी तथा पोलीसांनी पंचनामा तयार केला. ही घटना रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. नुकसानग्रस्त शेतकºयांचे एका संशयिताचे नाव पोलिसांना सांगितले.
शालीकराम बोरघरे रा. उमरवाडा यांची तीन एकर शेती तामसवाडी (तुडका) शिवारात आहे. ही शेती यशवंत तितीरमारे रा. तामसवाडी (तुडका) यांनी ठेका पध्दतीने घेतली होती. तीन एकरात सुमारे ३५ क्विंटल (५० पोती) धानाचे पुंजणे यशवंत तितीरमारे यांनी खुबी रचून ठेवली होती. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने धानाच्या खुीला आग लावली. तितीरमारे यांना घराजवळील एका इसमाने रात्री माहिती दिली.
आगीत ३५ क्विंटल धान भस्मसात झाला. याची तक्रार यशवंत तितीरमारे यांनी तुमसर पोलिसात दिली. एका संशयिताचे नावही तक्रारीत नमुद केले. तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून तुमसर पोलीस तपास करीत आहे. रामटेके व पोलिसांनी पंचनामा तयार केला. संबंधित शेतकºयाने आर्थिक मदतीची मागणी प्रशासनाला केली आहे.

Web Title: The fire was burnt down in two units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.