आधी रस्ते तयार करा अन्यथा रेती वाहतूक बंद करा
By admin | Published: November 4, 2016 12:55 AM2016-11-04T00:55:03+5:302016-11-04T00:55:03+5:30
तुमसर तालुक्यातील रेती घटांचा लिलाव महसूल प्रशसनाने केला. तत्पूर्वी इतर रेती घाटाचा लिलाव कारण्यात आला.
पंचबुध्दे यांचा इशारा : रस्ते ठरत आहेत मृत्यूचे सापळे
तुमसर : तुमसर तालुक्यातील रेती घटांचा लिलाव महसूल प्रशसनाने केला. तत्पूर्वी इतर रेती घाटाचा लिलाव कारण्यात आला. आलटून-पालटून दरवर्षी रेतीघाट लिलाव नित्यनियमाने करण्यात येत आहे. रेती घाटावर जाणारे रस्ते तथा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गावाला जातांनी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. आधी रस्ते दुरुस्त करा नंतरच रेतीची वाहतूक करा असा इशारा जि.प. सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी दिला आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. येथे रेती घाटांची संख्या जास्त आहे. या खेपेला महसूल प्रशासनाने बाम्हणी व चारगाव (दे) येथील रेती घाट लिलाव केला आहे. बाम्हणी तथा चारगाव गावांना जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. एक ते दीड फूट खोल व एक ते दोन मिटर लांब असे जीवघेणे खड्डे पडले आहेत. २५ ते ४० टन रेती ट्रीप वाहतूक या मार्गावर मागील दोन वर्षापासून सुरु आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. हे विशेष.
बाम्हणी तथा चारगाव (दे) रेती घाटातून रेतीचे ट्रक खापा-भंडारा या मार्गाने न जाता सुकळी (दे) रोहा-भंडारा या मार्गाने जातात. या मार्गावर १२ ते १५ गावे आहेत. रस्ता अरुंद आहे. रस्त्याची क्षमता नाही. ओव्हरलोड ट्रक या मार्गाने सर्रास मार्गक्रमण करतात दाभा येथे पोलिस चौकी आहे, पंरतु कारवाई शून्यच राहते.
मोहाडी तालुक्यातील निलज तथा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रेतीची वाहतूक याच मार्गाने केली जात आहे.
रेती घाट लिलाव करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यानी घाटावर जाणारे रस्ते त्यांची स्थिती काय आहे? याची पाहणी करणे अंत्यत गरजेचे झाले आहे.
तुमसर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी स्थानिक तहसिलदारांनी रेतीघाट लिलाव प्रक्रीयेत घाट लिलावात समावेश पूर्वी आक्षेप घेण्याची गरज आहे. रस्ते येथे जीव घेणारे ठरले आहेत. गावातून जाणारा रस्ता मृत्यूमार्ग ठरले आहेत.
राज्य शासनाला कोट्यावधींचा महसूल देणाऱ्या रेतीघाट गावांना जाणारे रस्ते आधी तयार न केल्यास रेतीची वाहतूक होऊ देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य के. के पंचबुध्दे यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे स्थानिक ग्रामस्थासह तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)