पहिल्या दिवशी आले ४२८ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:13 PM2018-03-12T23:13:04+5:302018-03-12T23:13:04+5:30

तरूणवर्ग आतुरतेने वाट पाहत असलेली पोलीस शिपाई भरती अखेर सोमवार पहाटे ५ वाजतापासुन सुरु झाली. यात पहिल्याच दिवशी ४२८ उमेदवारांनी हजर होऊन भरती प्रकियेत सहभाग नोंदविला.

On the first day came 428 candidates | पहिल्या दिवशी आले ४२८ उमेदवार

पहिल्या दिवशी आले ४२८ उमेदवार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात भरती सुरू

आॅनलाईन लोकमत
भंडारा : तरूणवर्ग आतुरतेने वाट पाहत असलेली पोलीस शिपाई भरती अखेर सोमवार पहाटे ५ वाजतापासुन सुरु झाली. यात पहिल्याच दिवशी ४२८ उमेदवारांनी हजर होऊन भरती प्रकियेत सहभाग नोंदविला.
पोलीस मुख्यालय भंडारा पोलीस मैदानावर सुरु झाली आहे. पोलीस अधिक्षक विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात सदर भरती प्रकीया घेण्यात येत आहे. शारीरीक चाचणी घेणे सुरु झाली आहे. पुरुष करीता लांब उडी, १०० मिटर धावणे, १६०० मीटर, गोळाफेक व पुलअ‍ॅप्स याची चाचणी घेण्यात येत आहे.
या भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ व्हिडीओ कॅमेरे व्हिडीओ ग्रॉफी करीता बसविण्यात आलेले आहे. १२ उत्तीर्ण ही या भरती प्रकीयेची शैक्षणिक पात्रता आहे. सदर भरती मध्ये एकुण ४२८ उमेदवारांनी हजर होऊन भरती प्रकियेत सहभाग घेतला.
सदर पोलीस भरती प्रकीयेसाठी १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधिक्षक, ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, ३२ पोलीस उपनिरीक्षक, ३९१ पोलीस कर्मचारी तसेच लिपीक वर्गातील कर्मचारी भरती प्रक्रियेत कर्तव्य पार पाडत आहेत.

Web Title: On the first day came 428 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.