लाखांदुरातील ‘आनंद मेळावा’ हा राज्यातील पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 12:19 AM2016-07-17T00:19:25+5:302016-07-17T00:19:25+5:30
जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही ...
बाळा काशीवार यांचे प्रतिपादन: लाभार्थ्यांना वस्तूंचे वितरण
लाखांदूर : जनतेची कामे, विकास कामांची माहिती, शासकिय योजनांचा लाभ हा ठरलेल्या दिवशी किवा तारखेलाच होणे गरजेचे नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ‘आनंद मेळावा’ सारखे विशेष कार्यक्रमाची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी केले.
लाखांदूर येथे आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे, मनोहर राऊत, माधुरी हुकरे, नगराध्यक्ष निलीमा हुमणे, पंचायत समिती सभापती मंगला बागमारे, ताहसीलदार विजय पवार, नगरपंचायत सदस्य विनोद ठाकरे, नरेश खरकाटे, प्रल्हाद देशमुख, हरीश बागमारे, वासुदेव तोंडरे, शिवाजी देशकर, खंडविकास अधिकारी देवरे उपस्थित होते.
यावेळी आ.काशिवार म्हणाले, जनतेच्या लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आनंद मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून शासकीय योजनांतून मिळणाऱ्या साहित्यांचे वाटप, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.
नृत्य, गीत, पथनाट्य सादर करून कार्यक्रमाप्रसंगी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या वतीने रोगनिदान शिबिर, महिला बचत गटातील महिलांनी स्टाल लावले, सायकलचे वाटप, सिंचन विहिरींना मंजुरी प्रदान करण्यात आली. खंडाविकास अधिकारी देवरे यांनी आनंद मेळावा हा तालुक्यात दरवर्षी घेणार आहे. जिल्हास्तरावर हा मेळावा घेण्यात यावा, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल. आभार विस्तार अधिकारी मेळे यानी मानले. (तालुका प्रतिनिधी)