भंडारा तालुक्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:48+5:302021-06-19T04:23:48+5:30
बाॅक्स तालुकानिहाय काेराेनाची स्थिती तालुका ॲक्टिव्ह बरे झालेले मृत्यू एकूण काेराेना रुग्ण भंडारा ३८ २४,१७६ ४९२ २४,७०६ ...
बाॅक्स
तालुकानिहाय काेराेनाची स्थिती
तालुका ॲक्टिव्ह बरे झालेले मृत्यू एकूण काेराेना रुग्ण
भंडारा ३८ २४,१७६ ४९२ २४,७०६
माेहाडी ११ ४,२५३ ९५ ४,३५९
तुमसर ०७ ६,९९१ ११९ ७,११७
पवनी ०९ ५,९०० १०४ ६,०१३
लाखनी २० ६,४२९ ९५ ६,५४४
साकाेली ३१ ७,५५० १०१ ७,६८२
लाखांदूर ११ २,८६७ ४९ २,९२७
एकूण १२७ ५८,१६६ १०५५ ५९,३४८
बाॅक्स
चार लाखांवर व्यक्तींची काेराेना चाचणी
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८ हजार ९८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. त्यात ५९ हजार ३४८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ५८ हजार १६६ व्यक्तींनी काेराेनावर मात केली तर, १०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला.
बाॅक्स
रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ६५ टक्क्यापर्यंत कमी झाले हाेते. परंतु जून महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. जिल्ह्यात सध्या ०.२१ टक्के सक्रिय रुग्ण असून, मृत्यूदर १.७८ टक्के आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १.३ टक्के आहे. एप्रिल महिन्यातील काेराेना उद्रेक अनुभवल्यानंतर रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने माेठा दिलासा मिळत आहे.