चारगाव सुंदरीत प्रथमच "माझी जबाबदारी" शासकीय निमशासकीय सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:46+5:302021-03-13T05:03:46+5:30
साकोली : शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांना लोकसेवेत त्यांची जबाबदारी काय, यावर चारगाव/सुंदरी ग्रामपंचायत सभागृहात प्रथमच सभा पार पाडण्यात आली या ...
साकोली : शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांना लोकसेवेत त्यांची जबाबदारी काय, यावर चारगाव/सुंदरी ग्रामपंचायत सभागृहात प्रथमच सभा पार पाडण्यात आली या सभेत सर्वच विभागांतील कर्मचारी हजर होते, हे विशेष.
या "माझी जबाबदारी"अंतर्गत गावातील आरोग्य, महसूल, अंगणवाडी, कृषी, शालेय शिक्षण अन्नपुरवठा व इतर विभागसेवेत असणा-या तलाठी, आरोग्यसेवक, आशासेविका, एफडीसीएम (वन्य) कर्मचारी, शिक्षक, कृषी सहायक, रोजगारसेवक, स्वस्त धान्य परवानाधारक अशा शासकीय, निमशासकीय व्यक्तींना गावातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा, शासकीय योजनांचा लाभ, कृषीविषयक लाभ, अपंग निधी व तहसील पंचायत समिती स्तरावरील सर्व जनसामान्यांचे निराकरण कसे करून माझी जबाबदारी कशी पार पाडावी, यावर सविस्तर मार्गदर्शनात सभा पार पडली. या सभेत उपस्थिती सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भिवगडे, तंमुस अध्यक्ष भूमेश्वर लंजे, सदस्य महेश जुगनाके, रूपेंद्र मोटघरे, मंगला सोनवाने, कविता वलथरे शासकीय सेवकांत ग्रामसेवक के.एम. झोडे, तलाठी एस.एम. ठाकरे, मुख्याध्यापक एन.एस. परशुरामकर, शिक्षिका एस.आर. गहाणे, मुख्याध्यापक एन.एस. शहारे जि.प. शाळा सुंदरी, एस.डी.बडगे आरोग्यसेवक, पी.एम. कोठे कृषीसेवक, आणिकराम लंजे स्वस्त धान्य संचालक, नरेश लंजे रोजगारसेवक, अंगणवाडी कार्यकर्ते सोनवाने, आशासेविका खोब्रागडे, आशासेविका तारा झोडे, आशा क्षीरसागर तसेच गावांतील ज्येष्ठ नागरिक सभेत हजर होते.