कान्हळगाव येथे पहिल्यांदाच महिला उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:42+5:302021-02-17T04:41:42+5:30

फोटो १६ लोक ०४े क मोहाडी : ग्रामपंचायत कान्हळगाव/सी येथील बहात्तर वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला उपसरपंचपदी विराजमान होण्याचा मान ...

For the first time in Kanhalgaon, women sub-panch | कान्हळगाव येथे पहिल्यांदाच महिला उपसरपंच

कान्हळगाव येथे पहिल्यांदाच महिला उपसरपंच

Next

फोटो १६ लोक ०४े क

मोहाडी : ग्रामपंचायत कान्हळगाव/सी येथील बहात्तर वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला उपसरपंचपदी विराजमान होण्याचा मान कांजन मुन्ना निंबार्ते यांना मिळाला आहे. उपसरपंचपदासाठी आरक्षण नसते, त्यामुळे बहुधा पुरुष ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंचपदावर निवडले जाते. यातून पुरुषप्रधान संस्कृती किती खोलवर रुजली गेली आहे, हे लक्षात येते, पण या पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत, कान्हळगाव सिरसोली गावातील ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुखांनी महिलेला उपसरपंचपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन महिला व दोन पुरुष सदस्यांनी बहुमताने कांचन मुन्ना निंबार्ते यांना उपसरपंचपदी निवडून दिले. कान्हळगावच्या ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच उपसरपंचपदावर महिला उपसरपंच विराजमान झाल्या आहेत.

बॉक्स

*रोहा, ताडगाव येथेही महिला उपसरपंच

तालुक्यातील सतरा ग्रामपंचायती रोहा, ताडगाव येथे लता बांडेबुचे, वनिता चौधरी यांना उपसरपंच करण्यात आले, तसेच सात ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत.

Web Title: For the first time in Kanhalgaon, women sub-panch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.